पनवेल - पॉक्सो केसप्रकरणी डीआयजी निशिकांत मोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल कोर्टानं फेटाळला आहे. त्यामुळे मोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या पुणे येथील एमटी विभागात डीआयजी पदावर मोरे कार्यरत आहेत. त्यांच्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी पनवेल सत्र न्यायालयात मोरे यांनी धाव घेतली. मात्र, आज सुनावणीदरम्यान न्यायालयाने जामीन फेटाळला आहे.
विनयभंगाची तक्रार खोटी असल्याचा पोलीस अधिकाऱ्याने केला दावा
डीआयजी मोरे प्रकरणातील तरुणी बेपत्ता; पोलिसांकडून शोधाशोध सुरु
काही पैसे रोख देऊन गाळ्याचा ताबा घेऊन उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप तक्रारदाराने ऑगस्ट महिन्यात पोलिसांकडे लेखी स्वरूपात केला होता. दरम्यान, जून महिन्यात १७ वर्षांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी निमंत्रण नसतानाही मोरे घरी आले. केप कापून मुलीच्या गालावर आणि शरीरावर केक लावून अश्लील वर्तन केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे तळोजा पोलिसांनी सांगितले होते. मात्र, दरम्यान अटक टाळण्यासाठी मोरे यांनी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता.