काका काकीला मूल नव्हतं, ७ वर्षांच्या पुतण्याला गळा दाबून संपवलं; शेतात लपवला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 14:46 IST2022-04-09T14:43:59+5:302022-04-09T14:46:46+5:30
घटनेमुळे परिसरात एकच खळबळ; पोलीस तपास सुरू

काका काकीला मूल नव्हतं, ७ वर्षांच्या पुतण्याला गळा दाबून संपवलं; शेतात लपवला मृतदेह
अमरोहा: उत्तर प्रदेशातील अमरोहात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सात वर्षीय मुलाची त्याच्याच काका काकींनी हत्या केली. पुतण्याला गळा दाबून संपवून काका काकींनी त्याचा मृतदेह ऊसाच्या शेतात लपवला. आरोपी त्याच्या कुटुंबासोबत मुलाचा शोध घेत होते. तितक्यात तिथे पोलीस पोहोचले. त्यांना काकांवर संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं गुन्ह्याची कबुली दिली.
गजरौलामधील ७ वर्षांचं टिंकूचं त्याचा काका मदन पाल आणि त्याच्या पत्नीनं अपहरण केलं. त्यानं त्याच्या काकांच्या मुलाला सोबत घेत टिंकूची गळा दाबून हत्या केली. टिंकूचा मृतदेह ऊसाचा शेतात लपवण्यात आला. पोलीस टिंकूचा शोध घेत असताना त्यांना मदन पालवर संशय आला. चौकशी दरम्यान त्यानं गुन्हा कबूल केला.
पोलीस क्षेत्राधिकारी सत्येंद्र कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ दिवसांपूर्वी टिंकूच्या काकानं त्याचं अपहरण केलं. मदन पालला लग्नाच्या ३ वर्षांनंतर मूल नव्हतं. त्यामुळे त्रस्त असलेल्या मदन पालनं पुतण्याच्या हत्येचा कट रचला. त्यानं टिंकूला फसवून घरापासून दूर नेलं आणि गळा दाबून त्याची हत्या केली. मदन पालनं मृतदेह शेतात लपवला. पोलिसांनी चार जणांना अटक केली असून तपास सुरू आहे.