शहरं
Join us  
Trending Stories
1
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
2
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
3
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
4
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
5
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
6
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
7
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
8
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
9
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
10
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
11
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
12
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
13
"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
14
मकरसंक्रांतीच्या दिवशीच दुर्दैवी घटना; चायनीज मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
15
"विराट आणि रोहित सतत गौतम गंभीरशी..."; टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने सगळंच सांगून टाकलं!
16
मुंबई मनपामध्ये भाजपापेक्षा स्ट्राईक रेट चांगला असल्यास महापौरपदावर दावा करणार का? शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले...
17
KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
विजय केडिया यांची मोठी गुंतवणूक, या स्मॉलकॅप स्टॉकवर लावला तगडा डाव; खरेदी केले १००००००० शेअर
19
Makar Sankranti 2026: संक्रांतीच्या संध्याकाळी तुळशीजवळ करा 'हे' २ छोटे उपाय; वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा!
20
पालक पनीर गरम केल्याने राडा; युनिव्हर्सिटीला २ भारतीय विद्यार्थ्यांना द्यावे लागले १.८ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

पती पत्नींसमोर 'असं' काही बोलला, ते ऐकून २ बायकांनी एकत्रच स्वत:चं आयुष्य संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 12:20 IST

माझ्या एका पत्नीचं नाव अफसाना आणि दुसरीचं हिना होतं. अफसानासोबत १५ वर्षापूर्वी आणि हिनासोबत ४ वर्षापूर्वी निकाह झाला होता असं पतीने सांगितले.

मुजफ्फरनगर - उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर इथं एका कुटुंबात धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी याठिकाणी एका व्यक्तीच्या दोन बायकांनी स्वत:चा जीव दिला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. 

कोतवालीच्या मिमलाना गावातील ही घटना आहे. ज्याठिकाणी जावेद नावाच्या व्यक्तीच्या २ बायका अफसाना आणि हिना यांनी टोकाचं पाऊल उचललं. या दोघींनी विषारी औषध पिऊन अखेरचा श्वास घेतला. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थली पंचनामा करत पोलिसांनी दोन्ही महिलेचे मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमोर्टमसाठी पाठवले. या २ बायकांचा पती जावेद स्वत: आत्महत्या करणार होता. परंतु त्याआधीच त्याच्या २ पत्नीने आयुष्य संपवलं. 

पती जावेद म्हणाला की, मृत महिला या दोघी माझ्या पत्नी होत्या. माझं वाहन पोलिसांनी पकडलं होते. त्याला ७० हजार रुपये चलान भरण्यास सांगितले. त्यातील मी १२ हजार रुपये भरले परंतु बाकी पैसे भरता येत नव्हते. त्यामुळे मी त्रस्त होतो. या नैराश्येत मी पत्नीसमोर अशा आयुष्याचा काय फायदा त्यापेक्षा मी मरण पत्करतो. गाडी सोडवू शकत नाही असं म्हटल्याचं त्याने सांगितले. मात्र माझ्यापूर्वी पत्नीनेच विष पिऊन आत्महत्या केली. माझ्या एका पत्नीचं नाव अफसाना आणि दुसरीचं हिना होतं. अफसानासोबत १५ वर्षापूर्वी आणि हिनासोबत ४ वर्षापूर्वी निकाह झाला होता. आज सकाळी ८.३० च्या सुमारास या दोघींनी विष प्यायलं. माझ्या जेव्हा हे लक्षात आले तात्काळ मी पोलिसांना घटनेबाबत कळवलं. तेव्हा पोलीस घरी आले. 

पोलिसांच्या माहितीनुसार, जावेदच्या २ पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद सुरू होता. ज्यामुळे दोघींनी विष पिऊन आत्महत्या केली आहे ही आतापर्यंत माहिती समोर आली आहे. सध्या दोघींचे मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत. याचा रिपोर्ट आल्यानंतर सत्य काय ते उघड होईल. त्याचसोबत सध्या पोलीस विविध अँगलने तपास करत आहेत. लवकरच यावर कार्यवाही केली जाईल अशी माहिती एसपी विजयवर्गीय यांनी दिली आहे.