८ वीची मुलगी बेपत्ता, WhatsApp मध्ये ३६ मुलांचे नंबर ब्लॉकलिस्ट; पोलीस चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 10:08 IST2022-03-14T10:08:15+5:302022-03-14T10:08:29+5:30
मुलगी बेपत्ता कुठे झाली? या काळजीनं नातेवाईकांनी सगळीकडे शोध घेतला परंतु हाती काही लागलं नाही. म्हणून कोतवाली पोलीस ठाणे गाठत मुलीच्या घरच्यांनी तक्रार नोंदवली.

८ वीची मुलगी बेपत्ता, WhatsApp मध्ये ३६ मुलांचे नंबर ब्लॉकलिस्ट; पोलीस चक्रावले
महाराजगंज – उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये २४ तासापूर्वी बेपत्ता झालेल्या ८ वीच्या मुलीचा पोलीस शोध घेत आहेत. या तपासात मुलीच्या फोन कॉल्सचे डिटेल्स पाहिले असता पोलीसही चक्रावले. सीडीआरनुसार, ही मुलगी ३६ मुलांसोबत रात्री उशीरापर्यंत चॅटिंग केल्यानंतर त्यांना ब्लॉक केले होते. या मुलांपैकी एकानं मुलीला आमीष दाखवून पळवून नेले मात्र त्यातील नेमका मुलगा कोण याचा शोध पोलिसांना अद्याप लागला नाही.
आता पोलीस बेपत्ता मुलीच्या शाळेतील सहकारी मैत्रिणींची चौकशी करत आहे. ही विद्यार्थिनीशी कोणत्या मुलासोबत जवळीक होती आणि तिच्या ग्रुपमध्ये कोणाचा समावेश आहे हे पोलीस शोधत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी त्यांच्याजवळ एक तक्रार आली. ज्यात शहरातील प्रतिष्ठीत शाळेत ८ वीच्या वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी वार्षिक परीक्षा देण्याच्या बहाण्यानं घरातून बाहेर पडली आणि पुन्हा घरी परतलीच नाही. कुटुंबाने शाळेशी संपर्क केला तेव्हा ती मुलगी शाळेत परीक्षा देण्यासाठी आलीच नाही असं सांगण्यात आले.
मुलगी बेपत्ता कुठे झाली? या काळजीनं नातेवाईकांनी सगळीकडे शोध घेतला परंतु हाती काही लागलं नाही. म्हणून कोतवाली पोलीस ठाणे गाठत मुलीच्या घरच्यांनी तक्रार नोंदवली. मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चौकशी सुरू केली. तेव्हा तिच्या मोबाईलमधील मेसेज तपासले. व्हॉट्सअप चॅटच्या आधारे मुलीच्या एका मित्राला बोलावून चौकशी केली तेव्हा मुलीचे अन्य मुलांसोबतचे चॅट पाहून तोदेखील रडायला लागला. सीडीआर रिपोर्टनुसार, ३६ नंबर असे होते ज्यांच्याशी मुलगी रात्री २-२ वाजेपर्यंत बोलत होती. त्यानंतर तिने हे सगळे नंबर ब्लॉक केले. अलीकडेच तिने ज्या नंबरवर संवाद साधला त्या मुलांशी पोलीस चौकशी करत आहे.
तपासावेळी एका विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले की, बेपत्ता मुलगी त्याला खूप आवडायची. त्याने बऱ्याचदा तिला आर्थिक मदतही केली आहे. परंतु ती इतक्या मुलांशी बोलतेय हे मला माहिती नव्हतं. ही गोष्ट त्याला समजताच तो रडायला लागला. पोलिसांनी त्या व्यक्तीला शांत केले. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणासाठी कुटुंबाने मुलीला मोबाईल घेऊन दिला होता. मुलीने घरातून जाण्यापूर्वी तिचा मोबाईल घरीच सोडला आणि फेसबुक फ्रेंडसोबत पसार झाली. जाण्यापूर्वी तिने तिच्या एका मैत्रिणीला ही गोष्ट सांगितली. पोलीस सध्या ब्लॉक नंबरशी निगडीत आणखी काही मुलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.