उल्हासनगरात एकाला गावठी कट्ट्यासह अटक
By सदानंद नाईक | Updated: September 13, 2023 15:00 IST2023-09-13T14:59:50+5:302023-09-13T15:00:47+5:30
मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान संशयितरीत्या उभ्या असलेल्या एका तरुणांची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी कट्टयासह एक जिवंत काडतुस मिळून आले.

उल्हासनगरात एकाला गावठी कट्ट्यासह अटक
उल्हासनगर : शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी ७ वाजता सापळा रचून संदीप भारद्वाज यालाशहाड फाटक उड्डाणफुल येथून अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टयासह जिवंत काडतुस मिळून आले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर शहाड फाटक उड्डाणफुल येथे एक जण गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती शहर गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्यावर, त्यांनी शहाड फाटक येथे सापळा रचला. मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान संशयितरीत्या उभ्या असलेल्या एका तरुणांची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी कट्टयासह एक जिवंत काडतुस मिळून आले.
पोलिसांनी संशयित तरुण संदीप जगमोहन भारद्वाज याला अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. संदीप भारद्वाज हा विठ्ठलवाडी खन्ना कंपाऊंड, प्रवीण नॅशनल हॉटेल परिसरात राहणारा असल्याचे उघड झाले.