शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

उल्हासनगरात भाजप विरुद्ध BJP, नगरसेवकासह 9 जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 15:11 IST

भाजप शहाराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्यासह पक्ष्याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी थिय्या दिल्यावर, पोलिसांनी गुन्हा दाखल केला, अशी माहिती नगरसेवक रामचंदानी यांनी दिली.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : भाजपचे युवा उपाध्यक्ष व दुकानदार नाणिक वाधवा यांना मारहाण केल्या प्रकरणी भाजपचे नगरसेवक विजू पाटील यांच्यासह ९ जणांविरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होण्यासाठी भाजप शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी आदींना ठिय्या आंदोलन करावे लागले. 

उल्हासनगर कॅम्प नं-५ ओटी सेक्शन येथील शक्ती गारमेंट दुकाना समोर मोहन नावाचा इसम वडापावची हातगाडी लावत होता. त्यावेळी दुकानदार व भाजपचे युवा उपाध्यक्ष नाणिक उर्फ बाबू वाधवा यांनी गुरवारी हातगाडी लावण्यास मनाई केली. याचा राग वडापाव गाडीधारकला आला. त्याने स्थानिक भाजप नगरसेवक विजु पाटील यांच्याकडे धाव घेऊन झालेला प्रकार सांगितला. नगरसेवक पाटील यांनी कार चालक बंटी, संदीप व इतर ६ ते ८ इसमानी शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता हातगाडी लावण्यास का मनाई केली. याचा जाब पाटील यांनी विचारून दुकानदार व भाजपचा युवा उपाध्यक्ष नाणिक वाधवा यांना जबर मारहाण केली. हिललाईन पोलीस वाधवा यांची तक्रार घेत नसल्याने, भाजप शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्यासह इतर पदाधिकार्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

भाजप शहाराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्यासह पक्ष्याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी थिय्या दिल्यावर, पोलिसांनी गुन्हा दाखल केला, अशी माहिती नगरसेवक रामचंदानी यांनी दिली. भाजप नगरसेवक विजू पाटील यांनी गेल्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणूक वेळी बंडखोरी करून शिवसेनेच्या मदतीने स्थायी समिती सभापती पदी निवडून आले. तेंव्हा पासून ते शिवसेने सोबत आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडणुक लढविणार असल्याचे बोलले जाते. याच रागातून भाजपाच्या शहराध्यक्षासह पदाधिकार्यांनी भाजप नगरसेवक विजू पाटील यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्याचे बोलले जाते. भाजपच्या आक्रमक पावित्र्याची भाजप कार्यकर्त्यात उत्साह संचारला असून कॅम्प नं-५ परिसरातील दबंगिरी मोडीत काढू. असा विश्वास शहराध्यक्ष पुरस्वानी यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरBJPभाजपाPoliceपोलिस