उल्हासनगरात रिक्षा चालकाने प्रवाशाला लुटले, पोलिसांत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 08:43 PM2022-07-09T20:43:15+5:302022-07-09T20:51:22+5:30

उल्हासनगर कॅम्प नं- ५ गणेशनगरात राहणारे लक्ष्मण साबळे हें रात्री ११ वाजता आटो रिक्षाने दूध नाका वरून घरी जात होते

In Ulhasnagar, an auto rickshaw driver robbed a passenger and lodged a case with the police | उल्हासनगरात रिक्षा चालकाने प्रवाशाला लुटले, पोलिसांत गुन्हा दाखल

उल्हासनगरात रिक्षा चालकाने प्रवाशाला लुटले, पोलिसांत गुन्हा दाखल

googlenewsNext

सदानंद नाईक 

उल्हासनगर : एका रिक्षाचालकाने साथीदाराच्या मदतीने प्रवाशाला लुटल्याची घटना शुक्रवारी कॅम्प नं-५ दूध नाका येथे घडली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत. 

उल्हासनगर कॅम्प नं- ५ गणेशनगरात राहणारे लक्ष्मण साबळे हें रात्री ११ वाजता आटो रिक्षाने दूध नाका वरून घरी जात होते. गणेशनगर येथे पोहोचताच रिक्षाचे भाडे देण्यासाठी साबळे यांनी पैसे काढण्यासाठी खिश्यात हात घातला. त्यावेळी रिक्षात बसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने, साबळे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून अंधारात पसार झाला. साबळे चोर चोर ओरडत त्याच्या मागे पळत सुटले. तर दुसरीकडे आटोरिक्षा चालक दुसऱ्या रस्त्याने पसार झाला. 

रिक्षाचालक व अज्ञात व्यक्तीने संगनमताने आपणास लुटल्याचे लक्षात आल्यावर, त्यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात धाव घेऊन झालेला सर्व प्रकार कथन केला. पोलिसांनी अज्ञात आटो चालक आणि एका अज्ञात चोरा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: In Ulhasnagar, an auto rickshaw driver robbed a passenger and lodged a case with the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.