गुन्हा दाखल होऊनही नवरदेव चढला बोहल्यावर; तळसंदेत हाणामारी, ५ जणांवर गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2024 15:28 IST2024-05-12T15:28:17+5:302024-05-12T15:28:27+5:30

त्याच दिवशी फिर्यादी वडर कुटुंबातील माणसांनी मोकाशी यांच्याशी भांडण तंटा केला. यात मोकाशी बंधूंनी वडर कंपनीला लाथा बुक्क्यांचा प्रसाद देत जखमी केले.

In Talsande, A young man who had an immoral relationship got married despite a case being registered | गुन्हा दाखल होऊनही नवरदेव चढला बोहल्यावर; तळसंदेत हाणामारी, ५ जणांवर गुन्हा 

गुन्हा दाखल होऊनही नवरदेव चढला बोहल्यावर; तळसंदेत हाणामारी, ५ जणांवर गुन्हा 

नवे पारगाव : तळसंदे ( ता. हातकणंगले ) येथे फिर्यादी पिडीत महिलेच्या सुनेशी अनैतिक संबंध ठेवून मुलाचा संसार मोडून लग्न करणाऱ्या तरुणाला अद्दल घडवताना दोन कुटुंबात हाणामारी झाली. ज्या तरुणावर गुन्हा दाखल झाला त्याचे लग्न मात्र त्याच वेळी वाजलं. घटना शुक्रवारी सकाळी घडली. घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : फिर्यादी पीडित महिलेची सुनेचे  तानाजी बाजीराव मोकाशी (रा.तळसंदे) याच्याशी अनैतिक संबंध होते. यामुळे फिर्यादीच्या सुनेला मुलग्याने घटस्फोटासाठी कोल्हापूर न्यायालयात दावा दाखल आहे. तेंव्हा पासून दोन कुटुंबात वाद सुरु आहेत. तानाजी मोकाशी याचे लग्न होणार होते. त्याच दिवशी फिर्यादी वडर कुटुंबातील माणसांनी मोकाशी यांच्याशी भांडण तंटा केला. यात मोकाशी बंधूंनी वडर कंपनीला लाथा बुक्क्यांचा प्रसाद देत जखमी केले.

याबाबत पिडीत महिलेने यांनी वडगाव पोलिसात फिर्याद दिली. धनाजी बाजीराव मोकाशी, तानाजी बाजीराव मोकाशी, आनंदा गणु मोकाशी, संतोष शिवाजी वडर, सागर शिवाजी वडर (रा. सर्व तळसंदे. ता. हातकणंगले) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पोतदार अधिक तपास करीत आहेत.

Web Title: In Talsande, A young man who had an immoral relationship got married despite a case being registered