शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावात धारदार तलवारीने एकाचा खून, मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 05:24 IST

गुन्हा दाखल : भांडणाची कुरापत काढून मारहाण

मालेगाव : मागील भांडणाची कुरापत काढून तलवारीने झालेल्या मारहाणीत एकाचा खून झाला असून, याप्रकरणी आझादनगर पोलिसांत संशयित आरोपी अफजल खान गुलशेर खान, कासीम (पूर्ण नाव माहीत नाही) असलम खान गुलशेर खान, जफर उल्ला खान अमन उल्ला खान ऊर्फ पहिलवान, वसीम भांजा (सर्व रा. मालेगाव) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयित आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

अब्दुल आहद मोहंमद इसाक ऊर्फ हमीद लेंडी (वय ३६), रा. सलीम मुन्शीनगर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. शनिवारी (दि.२३) रात्री दीड वाजेच्या सुमारास सलीम मुन्शीनगरात हा खून झाला. संशयित आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात लाकडी दांडके घेऊन मोहंमद इब्राहिम समसुद्दोहा यासोबत झालेल्या मागील भांडणाच्या कारणावरून त्यास संशयित आरोपी अफजल व कासीफ याने तलवारीने आणि असलम याने लाकडी दांडक्याने मारून दुखापत केली. इब्राहिम यास सोडविण्यासाठी त्याचा लहान भाऊ अब्दुल अजीज समसुद्दोहा हा आला असता त्यालादेखील संशयित आरोपी नासीरने लाकडी दांडक्याने, तसेच जफा पहिलवान आणि वसीम भांजा या दोन संशयित आरोपींनी तलवारीने मारून गंभीर जखमी केले. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मोहंमद इब्राहिम यास उपचारार्थ सामान्य रुग्णालय आणि तेथून खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMalegaonमालेगांवNashikनाशिकPoliceपोलिस