तरुणीवर सहा जणांकडून बलात्कार; मैत्रिणीला बोलावण्याची अट ठेवली; तिच्यावरही केला अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 09:38 IST2022-04-16T09:35:51+5:302022-04-16T09:38:30+5:30

दोन तरुणींवर सहा जणांकडून सामूहिक बलात्कार

in jharkhand five accused arrested in connection with gangrape of two woman | तरुणीवर सहा जणांकडून बलात्कार; मैत्रिणीला बोलावण्याची अट ठेवली; तिच्यावरही केला अत्याचार

तरुणीवर सहा जणांकडून बलात्कार; मैत्रिणीला बोलावण्याची अट ठेवली; तिच्यावरही केला अत्याचार

रांची: झारखंडची राजधानी रांचीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. एका तरुणीवर सहा जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर तिच्या मैत्रिणीला फोन करून बोलावण्यात आलं. त्यानंतर तिच्यावरही बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून सहावा आरोपी फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे.

तुपुदाना परिसरात वास्तव्यास असलेली तरुणी तिच्या नणंदेकडे गेली होती. गुरुवारी रात्री नणंदेनं तरुणीला एका तरुणासोबत घरी पाठवलं. तरुणीला घरी सोडण्यासाठी निघालेल्या तरुणानं त्याच्या पाच मित्रांना बोलावलं. सहा जणांनी तरुणीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. 

सहा जण तरुणीवर बलात्कार करून थांबले नाहीत. त्यांनी तिच्या सुटकेसाठी एक अट ठेवली. तुझ्या मैत्रिणीला बोलव, तरच तुला सोडू, असं आरोपींनी पीडितेला सांगितलं. घाबरलेल्या पीडितेनं तिच्या मैत्रिणीला फोन केला. थोड्याच वेळात मैत्रीण पोहोचली. त्यानंतर सहा जणांनी आळीपाळीनं तिच्यावर बलात्कार केला.

सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी दोन्ही तरुणींना धमकी दिली. यानंतर ते तिथून निघून गेले. आरोपी निघून जाताच पीडित तरुणींनी थेट पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली. आरोपींना पकडण्यासाठी छापे टाकले. पाच आरोपी पकडले गेले. तर सहाव्याचा शोध सुरू आहे.
 

Web Title: in jharkhand five accused arrested in connection with gangrape of two woman