भावानेच घातला डोक्यात दांडका; पुतण्यालाही काकूने भरली धमकी
By विलास.बारी | Updated: June 11, 2023 19:47 IST2023-06-11T19:47:50+5:302023-06-11T19:47:57+5:30
विटनेर शिवारातील घटना, जखमी अवस्थेत असलेल्या पुंडलिक गावंडे यांनी उपचार घेतल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली.

भावानेच घातला डोक्यात दांडका; पुतण्यालाही काकूने भरली धमकी
जळगाव : जुन्या वादातून भावानेच डोक्यात लाकडी दांडका घातल्याची घटना विटनेर शिवारात शनिवारी सकाळी घडली तसेच आवर घालण्यासाठी सरसावलेल्या पुतण्यालाही तुझ्या बापाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी काकूने भरली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पळासखेडा (जामनेर) येथील भागवत पुंडलिक गावंडे हे शेतकरी शनिवारी सकाळी विटनेर शिवारात आले. याठिकाणी जुन्या वादाच्या कारणावरून त्यांचा भाऊ कैलास पुंडलिक गावंडे व त्यांची पत्नी संगीता कैलास गावंडे यांनी वाद घातला. तेव्हा वादावादी पेटल्यावर कैलास गावंडे यांनी भावाच्या डोक्यात लाकडी दांडका टाकून त्यांना गंभीर दुखापत केली. दरम्यान, भागवत गावंडे यांचा मुलगा भांडण सोडविण्यासाठी गेला. तेव्हा संगीता गावंडे यांनी त्याची कॉलर पकडून तुला आणि तुझ्या बापाला जिवंत सोडणार नाही, तुम्ही आमच्या नांदी लागू नका, अशी धमकी दिली. जखमी अवस्थेत असलेल्या पुंडलिक गावंडे यांनी उपचार घेतल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार कैलास पुंडलिक गावंडे व संगीता पुंडलिक गावंडे रा. पळसखेडा मिराचे ता. जामनेर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. प्रदीप पाटील हे करीत आहे.