विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा, मित्राच्या बहिणीने केली तक्रार

By काशिराम म्हांबरे | Published: August 17, 2023 08:07 PM2023-08-17T20:07:07+5:302023-08-17T20:07:53+5:30

भावाचा मित्र असल्याने तिने त्याला घरात घेतले, पण...

In case of molestation, a case has been filed against one, a complaint has been filed by the sister of a friend | विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा, मित्राच्या बहिणीने केली तक्रार

विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा, मित्राच्या बहिणीने केली तक्रार

googlenewsNext

म्हापसा, काशीराम म्हांबरे: एका युवतीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी सागर शिरोडकर (औचितवाडा, थिवी ) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला. ही घटना सोमवार दि.१४ रोजी सकाळी घडली होती. संशयित फिर्यादी पीडितेच्या घरी गेला होता. संशयित हा पीडितेच्या भावाचा मित्र आहे. भावाचा मित्र असल्याने तिने त्याला घरात घेतले. घरी कुणीच नसल्याचे पाहून संशयिताने तिचा हात पकडला आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारातून पिडीताने स्वतःला सावरत जोरदार विरोध केला.

संध्याकाळी पीडितेने ही गोष्ट आपल्या भावाला सांगितली. त्यानंतर त्यांनी म्हापसा पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली. करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयित सागर शिरोडकर यांच्याविरुद्ध भादंसंच्या ४५१, ५०९ व ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: In case of molestation, a case has been filed against one, a complaint has been filed by the sister of a friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.