शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

स्क्रू ड्रायव्हरने एटीएम फोडणारे दोघे गजाआड, २१ एटीएममध्ये चोऱ्या केल्याची माहिती 

By गौरी टेंबकर | Updated: April 5, 2023 15:35 IST

पत्रा तोडून सापडले पोलिसांच्या तावडीत.

मुंबई: बोरिवली पश्चिम परिसरात असलेल्या बँसिन कॅथलिक को ऑपरेटिव्ह बँकेत दोन अनोळखी इसमांकडून स्क्रू ड्रायव्हरनेएटीएम मनी डिस्पेंस पट्टी तोडून त्यातील रोख रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकानी एमएचबी कॉलनी पोलिसात तक्रार दिल्यावर धीरेंद्रकुमार रामदेव पाल आणि अभिषेक रामअजोर यादव यांना बुधवारी अटक करण्यात आली. पोलिसांना पाहून घराचा पत्रा तोडून ते पळण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र अखेर पोलिसांच्या तावडीत सापडले.

तक्रारदार जय फरगोज (३०) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी संध्याकाळी त्यांच्या बोरिवली शाखेतील एटीएम सेंटरचा सुरक्षा रक्षक सुभाष कुमार मातो याने त्यांना कळवले की एटीएममध्ये येणाऱ्या ग्राहकांना व्यवहार होण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे फरगोज यांनी मशीनचे देखभाल करणारे मंदार सावंत यांना बोलावत त्याची तपासणी करण्यास सांगितली. तेव्हा मशीनमधील पट्टा कोणीतरी तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे असे सावंत यांनी फरागोज यांना सांगितले. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी असलेली सीसीटीव्ही फुटेज ५ मार्च रोजी पडताळले. ज्यात एक ग्राहक एटीएम मध्ये दोन अनोळखी इसम घुसले आणि त्यांनी स्क्रू ड्रायव्हर सदृश्य वस्तूने त्यात छेडछाड करत बाहेर आले.

काही वेळाने हे ग्राहक पैसे काढायला आला मात्र पैसे न निघाल्याने तो परत गेला. तेव्हा छेडछाड करणारी संपूर्ण आत शिरले आणि त्यांनी एटीएम मशीनच्या कॅश विड्रॉवल करण्याच्या ठिकाणी हात घालत त्यातील बेल्ट हाताने खेचून काढला व पैसे आले की नाही याची खात्री करत तिथून पळ काढला. त्यामुळे जवळपास १८ आणि २५ वयोगटातील दोघांवर एम एच बी कॉलनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सचिन शिंदे , सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार, हवालदार शिंदे, खोत, नाईक देवकर, शिपाई सवळी शेरमाळे, मोरे आणि परिमंडळ ११ च्या शिपाई रुपाली डाईंगडे यांनी सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी चोरी करून आरोपी उत्तर प्रदेशला जात असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांच्यावर लक्ष ठेवत अखेर ठाण्याच्या जय भीमनगरमध्ये पत्र्याच्या झोपडीत लपले होते. त्यावेळी पवार यांच्या पथकाने त्यांच्या झोपडीस चारही बाजूने घेरले. तेव्हा आरोपीने पत्रा तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांनी एम एच बी कॉलनीसह टिळक नगर, तुळीज, मीरा भाईंदर, नालासोपारा, चेंबूर, डोंबिवली या ठिकाणी मिळून २१ एटीएम फोडल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी