शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वाहन व जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात; ९ गुन्ह्यांची उकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 17:00 IST

रिक्षा व जबरी चोरी गुन्हयांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सदर घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपीत यांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याबात सुचना दिल्या होत्या.

मंगेश कराळे

नालासोपारा - गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी वाहन व जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून नऊ गुन्ह्यांची उकल करून ५ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस आयुक्तालयाचे जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी मंगळवारी ही माहिती दिली. 

भाटपाड्याच्या साईराम चाळ येथे राहणाऱ्या सोनू झा (२९) यांची पन्नास हजारांची दुचाकी मेहता चक्कीजवळ, भाटपाडा येथे पार्क केली होती. १८ फेब्रुवारीला रात्री चोरट्यांनी ती चोरून नेली. विरार पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयातील वसई-विरार परिसरात गेल्या काही महिन्यापासुन दुचाकी, रिक्षा व जबरी चोरी गुन्हयांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सदर घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपीत यांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याबात सुचना दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने गुन्हे शाखा, युनिट तीनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाव्दारे आरोपी रईस अकबर शेख (२६) याला २१ फेब्रुवारीला ताब्यात घेवुन त्याचेकडे कौशल्यपुर्वक तपास करुन सहा गुन्ह्यांची उकल करत चोरीच्या २ रिक्षा व ७ दुचाकी असा एकुण ४ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.        तसेच ३ फेब्रुवारीला ग्लोबलसिटीत राहणारे सुशांत शशिकांत चव्हाण (३०) हे फोनवर बोलत पायी अग्रवाल ग्रुप बाजुकडे जात होते. त्यावेळी पतंजली दुकानाच्या समोर पाठीमागुन दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींपैकी एकाने त्यांचे हातातील मोबाईल जबरीने हिसकावुन चोरी करुन पळुन गेले. अर्नाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणव्दारे आरोपी संजु राजु पाटील (२५) आणि आमिर तजम्मुल शेख (२२) या दोघांना २४ फेब्रुवारीला ताब्यात घेतले. आरोपीकडे चौकशी करून तीन गुन्ह्यांची उकल करत गुन्हयात वापरलेले वाहन व जबरी चोरी झालेला १ लाख ३३ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, शिवाजी खाडे, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सागर बारावकर, सचिन घेरे, शंकर शिंदे, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, प्रविण वानखेडे, सागर सोनवणे, गणेश यादव, संतोष चव्हाण यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिस