प्रेमविवाह झालेल्या सैनिकाने चिरला पत्नीचा गळा, त्यानंतर सासऱ्यावरही चाकूहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 06:33 IST2023-02-24T06:32:58+5:302023-02-24T06:33:53+5:30
विकास हा सैन्यात कार्यरत असून, दोघे पती-पत्नी नागपूरला राहतात. सुटीवर आलेला विकास बुधवारी पत्नी व मुलासह भालेराव यांच्याकडे आला होता.

प्रेमविवाह झालेल्या सैनिकाने चिरला पत्नीचा गळा, त्यानंतर सासऱ्यावरही चाकूहल्ला
अकोला - कौटुंबिक वादातून सैन्यदलात कार्यरत असलेल्या पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी रात्री खरप नाल्याजवळ घडली. या प्रकरणात पोलिसांनी पतीविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल केला. जखमी पत्नीवर अकाेला जिल्हा सर्वाेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सदाशिव महादेव भालेराव (७३) यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलीचा २०१७ मध्ये विकास वाल्मीक इंगळे (३१, रा. गोंधापूर) याच्यासोबत प्रेमविवाह झाला. विकास हा सैन्यात कार्यरत असून, दोघे पती-पत्नी नागपूरला राहतात. सुटीवर आलेला विकास बुधवारी पत्नी व मुलासह भालेराव यांच्याकडे आला होता.
सासरे जखमी
मेन हॉस्पिटलमध्ये मुलीला भेटण्यासाठी पोहोचल्यावर सासरे सदाशिव भालेराव यांनी जावई विकासला जाब विचारला असता, त्यांच्यावरही त्याने चाकूने हल्ला केला. यात भालेराव यांच्या हाताला व बोटांना जखम झाली.