शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आई की वैरीण! अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या चिमुकलीची आईकडून हत्या, मृतदेह विहिरीत फेकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 12:04 IST

जेव्हा पतीने पुन्हा पुन्हा मुलीबाबत विचारले तर तिने नेहमी टोलवा टोलवीची उत्तरे दिली. यादरम्यान सासरच्या लोकांना संशय आला आणि त्यांनी पोलिासात तक्रार दिली.

उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमधून आईच्या नात्याला काळिमा फासणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे प्रेम प्रकरणात अडथळा ठरत असलेल्या पाच वर्षाच्या मुलीची तिच्याच आईने हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह विहिरीत फेकला.  यादरम्यान आरोपी महिला मोठ्या आरामात आपल्या सासरी राहत होता. पण मुलीबाबत तिने कुणाला काहीच सांगितलं नाही. जेव्हा पत्नीने पुन्हा पुन्हा मुलीबाबत विचारले तर तिने नेहमी टोलवा टोलवीची उत्तरे दिली. यादरम्यान सासरच्या लोकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसात तक्रार दिली.

ही घटना डलमऊ भागातील सुरसना गावातील आहे. आरोपी महिलेचं लग्न बलभद्रपूर गावातील संतोष कुमारसोबत झालं होतं त्यांना एक पाच वर्षांची मुलगीही होती. या मुलीला घेऊन महिला होळीआधी माहेरी गेली होती. ती ३१ मार्चला पुन्हा सासरी परत येणार होती. पण ती आली नाही. नंतर सासरच्या लोकांनी तिचा शोध घेतला. पण काही पत्ता लागला नाही. (हे पण वाचा : बॉयफ्रेन्डसोबत हॉटेलवर मजा मारायला गेली होती पत्नी, अचानक पती समोर आला आणि मग....)

महिलेच्या सासरच्या लोकांना कुणीतरी सांगितले की, ती दिबियापूर गावातील तिच्या प्रियकरासोबत त्याच्या घरात राहत आहे. जेव्हा ती पुन्हा सासरी परतली तेव्हा तिच्यासोबत मुलगी नव्हती. नंतर सासरच्या लोकांनी मुलीचा शोध घेत पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी जेव्हा शोध सुरू केला तेव्हा मुलीचा मृतदेह बलभद्रपूर गावापासून ५०० मीटर दूर विहिरीत सापडला.

मुलीचा मृतदेह विहिरीत सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच एसपी, सीओ आणि फॉरेन्सिक टीम तिथे पोहोचली. जेव्हा पोलिसांनी मुलीच्या आईची चौकशी केली तेव्हा तिने सांगितले की, तिचं वर्षभरापासून एका व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण सुरू आहे आणि ती दोन दिवसांपासून त्याच्यासोबत राहत होती.

त्यासोबतच आरोपी महिलेने सांगितले की, तिची पाच वर्षांची मुलगी वडिलांना माझ्या प्रेम प्रकरणाबाबत सांगण्याबाबत बोलत होती. त्यामुळे मी माझ्या प्रियकरासोबत मिळून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. जेणेकरून आमच्या प्रेम प्रकरणाबाबत कुणाला काही कळू नये. (हे पण वाचा : 'मला फक्त मित्र म्हणून राहायचंय', असं बोलला, म्हणून तरूणीनं शेअर केले न्यूड फोटो अन् मग....)

रायबरेलीचे एसपी श्र्लोक कुमार यांनी सांगितले की, मुलीचा मृतदेह विहिरीतून काढून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. तेच मुलीच्या वडिलांची स्थिती रडून फारच खराब झाली आहे. त्याने कधी विचारही केला नसेल की, त्याची पत्नी स्वत:च्या मुलीसोबत असं करेल. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी