अवैधरित्या बाळगलेले जंगली पोपट अन् कासव यांची तस्करी करणारे पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2022 16:43 IST2022-12-21T16:43:03+5:302022-12-21T16:43:16+5:30
ठाण्यातील वन संरक्षण वन्यजीव विभागाला माहिती मिळाली होती की मालाडमध्ये अवैधरीत्याने जंगली १पोपट आणि कासव म्हणजेच ७ स्टार कासव आहेत.

अवैधरित्या बाळगलेले जंगली पोपट अन् कासव यांची तस्करी करणारे पोलिसांच्या ताब्यात
ठाणे- ठाणे वनरक्षक परिक्षेञाअंर्तगत अवैधरित्या बाळगलेले जंगली पोपट आणि कासव तस्करांच्या तावडीतून वनविभाग व डब्ल्यूडबल्यूएच्या संयुक्त कारवाईत पकडण्यात आले आहेत. कारवाईत पकडलेल्या प्राणी व पक्ष्यांसह टीम वनविभाग कार्यालय, तीन हात नाका, वाहतूक उपायुक्त कार्यालयासमोर, ठाणे उपस्थित आहे.
ठाण्यातील वन संरक्षण वन्यजीव विभागाला माहिती मिळाली होती की मालाडमध्ये अवैधरीत्याने जंगली १पोपट आणि कासव म्हणजेच ७ स्टार कासव आहेत. नंतर प्रॉफिट मार्केटमध्ये आम्ही धाड टाकली तिथं आम्ही नऊ ब्लॅक स्पॉटेड कासव आणि चार प्याराकेत पोपट हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नागरिकांना माझी एवढीच विनंती आहे की, अशा प्रकारे वन्य प्राण्यांना पाळणे आणि घरात खूप धन संपत्ती येणार याप्रकारे अंधश्रद्धा आणि वन्य प्राण्यांना आपल्या घरी पाळणे हे वन्य रक्षक अधिनियम 1972 चे अंतर्गत आपल्यावर कारवाई होऊ शकते, अशी प्रतिक्रीया रोहित मोहिते मानद वन्यजीव रक्षक यांनी दिली.