शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला होकार दिला नाही तर तोंडावर अ‍ॅसिड फेकेन! पुण्यात दोन घटनांनी उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 13:21 IST

हडपसर आणि वारजे येथे तरुणांविरुद्ध गुन्हे दाखल

पुणे : तू माझ्याशी लग्न कर नाही तर तोंडावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी दिल्याचे दोन धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी हडपसर व वारजे पोलिसांनी दोघा तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. महादेवनगर येथे राहणाऱ्या एका ३३ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अरुण बाबासाहेब खडतरे (रा. त्रिदलनगर, येरवडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व आरोपी हे तोंड ओळखीचे आहेत. आरोपी हा २० आॅक्टोबर रोजी रात्री फिर्यादीच्या घरी आला. त्याने फिर्यादीशी जवळीक साधून तु माझ्याशी लग्न कर असे म्हणून तिचा विनयभंग केला. त्यावेळी फिर्यादीने आरडाओरडा केल्याने तिचे आई वडिल सोडविण्यासाठी आले. तेव्हा त्याने त्यांना मारहाण करुन ढकलून दिले. लग्नाला हो म्हटली नाही तर तुझ्या वडिलांना खल्लास करुन टाकून तुझ्या तोंडावर अ‍ॅसिड फेकून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्याने घरातील साहित्याची तोडफोड करुन काही साहित्य बरोबर घेऊन गेला. या प्रकाराने ते सर्व कुटुंब घाबरले होते. शेवटी त्यांनी बुधवारी हडपसर पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली असून पोलीस तपास करीत आहेत.

दुसरी घटना शिवणे येथे घडली. याप्रकरणी एका २५ वर्षाच्या तरुणीने वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मयुर सुरेश कुडले (वय ३०, रा. पोतनीस परिसर,कोथरुड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी व आरोपी हे ओळखीचे आहेत.आरोपी हा २७ आॅक्टोबर रोजी सायंकाळी फिर्यादीच्या सोसायटीत आला होता. त्याने फिर्यादीला तू लग्न करायचे नाहीस, तू फक्त माझे सोबत लग्न करायचे़ तू फक्त माझी आहेस. तू जर लग्न केलेस तर तुझ्या नवऱ्यास मी मारुन टाकीन, तुझ्या चेहऱ्यावर मी अ‍ॅसिड फेकेन, तु परत कोणास कधी तोंड दाखवू शकणार नाहीस, अशी धमकी दिली. या प्रकाराने फिर्यादी या घाबरुन तेथून निघून जाऊ लागल्यावर आरोपीने त्यांचा पाठलाग करुन त्यांच्याशी सलगी वाढविण्याचा प्रयत्न केला. वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस