शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

'मी घाबरलो आणि पोलिसांशी खोटे बोललो, अल्वर बलात्कार पीडितेला घेऊन जाणारा रिक्षाचालकाने दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 18:01 IST

Alwar Gangrape Case : जेव्हा त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. तेव्हा यादवने कबूल केले की, तो घाबरला होता आणि नंतर त्याने  त्यादिवशी क्रूरपणे बलात्कार करण्यात आलेल्या १६ वर्षीय मुलीला आपण रिक्षात बसवले नाही असे त्याने पोलिसांना खोटे सांगितले.

देशाला हादरून टाकणाऱ्या अलवर येथे झालेल्या सामूहिक बलात्कार पीडितेला रिक्षेतून घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकाने भीती आणि स्वसंरक्षणाची हेतूमुळे पोलिसांना त्या दुर्दैवी दुर्दैवी दिवशी तिला आपल्या रिक्षातून नेल्याची माहिती दिली नाही. 

Aaj Tak/India Today या माध्यमांनी अलवरमध्ये पीडित तरुणी राहत असलेल्या ठिकाणापासून सुमारे 3 किमी अंतरावर असलेल्या त्याच्या गावात ऑटो रिक्षाचालक राजू यादव (28) याचा माग काढला. या प्रकरणी राजू यादवला पोलिसांनी दोनदा समन्स बजावले आहे. २०१५ मध्ये त्याचे लग्न झाले आणि त्याला दोन मुले आहेत. जरी तो घाबरलेला दिसत असला तरी त्याने स्वेच्छेने आज तक/इंडिया टुडेसोबत त्याने त्याची बाजू मांडली."ती रस्त्यावर उभी होती आणि तिने थांबण्याचा सिग्नल दिल्यावर मी थांबलो. दुपारी 1:05 वाजताच्या सुमारास ती माझ्या ऑटोमध्ये बसली. ऑटोमध्ये 13 प्रवासी होते. ती मोनाच प्याओ (Monach pyao) येथे उतरली. मी गेल्या दोन वर्षांपासून वाहन चालवत आहे. तीन वर्षांपर्यंत मी त्या मुलीला [घटनेच्या दिवसापूर्वी] कधीही पाहिले नव्हते," यादव म्हणाले.

नंतर, जेव्हा त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. तेव्हा यादवने कबूल केले की, तो घाबरला होता आणि नंतर त्याने  त्यादिवशी क्रूरपणे बलात्कार करण्यात आलेल्या १६ वर्षीय मुलीला आपण रिक्षात बसवले नाही असे त्याने पोलिसांना खोटे सांगितले."मी घाबरलो! त्यामुळेच मी सुरुवातीला पोलिसांना सांगितले की, मी मुलीला माझ्या ऑटोमध्ये फिरवले नाही. पण जेव्हा मला दुसऱ्यांदा बोलावण्यात आले, तेव्हा मी त्यांना सांगितले की, मी तिला अमुक ठिकाणी सोडले आहे. मी मुलीला रिक्षात बसवले आणि  ती २० किमी दूर मोनाचमध्ये उतरली" असा त्याने खुलासा केला.

अलीकडेच राजस्थानमधील अलवरमध्ये सामूहिक बलात्काराची पीडित ठरलेल्या मूकबधिर मुलीची जयपूर येथे डॉक्टरांच्या पथकाने आठ तास शस्त्रक्रिया केली. मात्र, शस्त्रक्रियेदरम्यान 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर ज्या प्रकारे बलात्कार झाला, तो क्रौर्य पाहून डॉक्टरही हादरले. तिच्यावर सामूहिक बलात्कार तर झालाच, पण धारदार वस्तूने वार करून तिच्या गुप्तांगाला अतिशय वाईटरित्या जखमा झाल्या होत्या. गुप्तांगात धारदार वस्तू घातली होती, त्यामुळे गुप्तांग आणि गुदद्वार एकच झाला होता.

गुप्तांगावर धारदार शस्त्राने प्रहार; गँगरेप झालेल्या युवतीचे ऑपरेशन करताना डॉक्टरही हादरले

नराधम आरोपींनी मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या मुलीला उचलून तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केल्याची लज्जास्पद घटना घडली आहे. मुलीला बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी फरार झाले. स्थानिक लोकांच्या मदतीने पीडित मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होत होता, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षाRajasthanराजस्थान