शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 19:39 IST

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ पोलीस दलात खळबळ उडाली. 

माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचा भाचा विक्रम सिंह राणा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. 'माझ्यासमोर मरण्याशिवाय काहीच पर्याय राहिलेला नाही', असं म्हणणार्‍या विक्रम सिंह राणांच्या व्हिडीओने पोलीस दलही हादरले. हे प्रकरण १८ कोटी रुपयांचे असून, पोलिसांनी याबद्दल माहिती दिली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

विक्रम सिंह राणा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात त्यांनी १८ कोटी रुपयांच्या प्रकरणाचा उल्लेख केला आहे. त्यांनी डेहरादून पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत. तक्रार करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. 

व्हिडीओमध्ये राणा म्हणत आहेत की, 'डिसेंबर २०२४ मध्ये डेहरादून पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पण आजपर्यंत पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. पोलीस पक्षपातीपणा करत आहे, असा आरोप त्याने केला आहे. 

पोलिसांनी काय सांगितले?

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली. डेहरादूनचे पोलीस अधीक्षकांनी निवेदन प्रसिद्ध करून भूमिका स्पष्ट केली. विक्रम सिंह यांच्या तक्रारीचा तपास मसुरीच्या पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवलेला आहे. प्राथमिक तपासातून हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तक्रारदाराला न्यायालयात खटला दाखल करण्याचा सल्ला दिला गेला होता. 

दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास एसपींकडे देण्यात आली आहे. ते या घटनेची सर्व अंगाने चौकशी करतील. सोशल मीडियावरून केलेले गंभीर आरोप आणि आत्महत्या करण्याच्या धमक्यांची दखल घेतली गेली असून, आवश्यक पावले उचलली जात आहेत, असेही पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओCrime Newsगुन्हेगारीUttarakhandउत्तराखंडPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया