शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मी बोलू शकत नाही आता तुला ... नवऱ्याच्या टोमण्यांना कंटाळून पत्नीने पतीची जीभ चावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 22:09 IST

The wife bit her husband's tongue : या घटनेत पत्नीने उचललेले हे भयंकर पाऊल पाहून सगळेच अचंबित झाले आहेत.

बरेली : बरेलीमध्ये एका महिलेने आपल्याच पतीची जीभ दाताने चावली. यामुळे पतीला रक्तस्त्राव झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली. जिल्ह्यातील शीसगड पोलीस स्टेशन हद्दीतील बल्ली गावात ही घटना घडली. या घटनेत पत्नीने उचललेले हे भयंकर पाऊल पाहून सगळेच अचंबित झाले आहेत.बायको बोलत नाही म्हणून टोमणे मारायचापती श्रीपाल मौर्य हा मजूर आहे. वर्षभरापूर्वी त्याचे बिहारमधील एका महिलेशी लग्न झाले होते. महिला मुकी असल्याने तिला बोलता येत नाही, फक्त ऐकू येते. बोलण्याऐवजी ती हातवारे करून तिचा मुद्दा समजावून सांगते. श्रीपाल बोलत नाही म्हणून अनेकदा टोमणे मारायचा. तो दररोज पत्नीला मारहाण करायचा. ही महिला टोमणे आणि मारहाणीला कंटाळली होती, असे सांगण्यात येत आहे.बुधवारी रात्री श्रीपाल त्यांच्या घरी आला आणि थकल्यामुळे तो झोपला, असे सांगितले जाते. इतक्यात त्यांच्या पत्नीने जेवण बनवले आणि पतीला जेवायला उठवायला सुरुवात केली, पण जेवण्याऐवजी श्रीपालने तिला शिवीगाळ केली आणि तिला पुन्हा काही बोलता येत नाही असा टोमणा मारला, त्यामुळे महिलेला इतका राग आला की, तिला श्रीपालला दाताने चावावे लागले. त्याची जीभ चावून तुकडा पडला. श्रीपालची जीभ पूर्ण ताकदीने चावल्यामुळे रक्तस्त्राव झाला. त्याने आरडाओरड केल्याने घरातील लोक जमा झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.महिलेने हावभावात सगळा प्रकार सांगितलाश्रीपालची जीभ कापल्यानंतर महिलेने सर्व प्रकार लोकांना सांगितला. टोमणे ऐकून आणि मारहाणीला कंटाळून तिने हे कृत्य केल्याचे हावभावात सांगितले. आतापर्यंत श्रीपालच्या कुटुंबीयांनी पत्नीवर कोणतीही पोलीस कारवाई केली नसली तरी महिलेच्या या कृत्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशDomestic Violenceघरगुती हिंसा