शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अपुर्ण दोषारोपपत्र दाखल केल्याने जामिनास पात्र : अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 12:51 IST

पोलिसांनी केवळ सर्वोच्च न्यायालयात दाखविण्यासाठी घाईने अपुरे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

ठळक मुद्देनिषेध नोंदवून आरोपपत्र स्वीकारत असल्याची केली तक्रार९० दिवसांत मला दोषारोपत्राची पूर्ण कॉपी मिळणे होते आवश्यक कोठडी न्यायालयाने ३ डिसेंबरपर्यंत वाढवली 

पुणे : अर्धवट दोषारोपत्र दाखल झाले असेल तर मला जामीन मिळण्याचा अधिकार असल्याचे एल्गार व कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी अ‍ॅड. सुरेद्र गडलिंग यांनी सोमवारी न्यायालयात सांगितले. निषेध नोंदवून दोषारोपपत्र स्विकारत असल्याची तक्रार त्यांनी केली. याप्रकरणात दोषारोपपत्र सादर करण्यासाठी पोलिसांनी ९० दिवसांचा कालावधी मागितला होता. त्यानुसार विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी मुदतवाढ दिली होती. मात्र, तांत्रिक अडचण असतानाही दोषारोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ दिल्याने त्याला पाचही जणांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाने पाचही जणांचा अर्ज मान्य करताना सत्र न्यायालयाने दिलेली मुदत वाढ चुकीचे असल्याचे नमूद केले होते. त्यावर पुणे पोलीस तत्काळ सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्या अर्जावरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने १६ नोव्हेंबर तारीख ठेवली होती. मात्र त्या आधीच सत्र न्यायालयाकडून अ‍ॅड. गडलिंग, रोना विल्सन, शोमा सेन, महेश राऊत आणि सुधीर ढवळे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान, एल्गार परिषदेत झालेल्या भाषणांमुळेच कोरेगाव भीमा हिंसाचार घडल्याचे व त्यात माओवाद्यांचा सहभाग असल्याचे दोषारोपपत्र पोलिसांनी १५ नोव्हेंबर रोजी म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील तारखेच्या अगोदर सायंकाळी सहा वाजता न्यायालयात दाखल केले असल्याचे अ‍ॅड. गडलिंग यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच दाखल केलेले दोषारोपपत्र व कागदपत्रे अद्यापपर्यंत मला मिळाली नसल्याचेही सांगितले. त्यावर जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी काही कागदपत्रे फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आली आहे. ती मिळताच ती गुन्ह्यातील संशयीत आरोपींना पुरविण्यात येईल असे सांगितले. त्यावर अ‍ॅड. गडलिंग म्हणाले, पोलिसांनी केवळ सर्वोच्च न्यायालयात दाखविण्यासाठी घाईने अपुरे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. ९० दिवसांत मला दोषारोपत्राची पूर्ण कॉपी मिळणे आवश्यक होते. पोलिसांनी जर अपुरे दोषारोपत्र दाखल केले असेल तर मी डिफॉल्ट जामीन मिळण्यास पात्र असल्याचा युक्तिवाद केला. .....................कोठडी न्यायालयाने ३ डिसेंबरपर्यंत वाढवली सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, वर्णन गोन्साल्वीस यांची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने ३ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. तर महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाचे म्हणणे सादर करून त्यावर २२ नोव्हेंबरला युक्तीवाद करणार असल्याचे न्यायालयास सांगितले.

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPoliceपोलिसCourtन्यायालय