शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

काही जणांनी रचलेल्या कारस्थानाचा मी बळी : पार्थ चॅटर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 11:43 IST

त्यांच्या तिसऱ्या फ्लॅटमधून कोणत्या गोष्टी ईडीने जप्त केल्या, याचा तपशील उपलब्ध झालेला नाही. 

कोलकाता : शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीने अटक केलेेले पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी आरोप केला की काहीजणांनी रचलेल्या कारस्थानाचा मी बळी ठरलो आहे. माझ्याविरोधात तृणमूल काँग्रेसने केलेली कारवाई योग्य आहे की नाही, हे येणारा काळच ठरवेल, असेही ते म्हणाले. पार्थ चॅटर्जी यांना ईडीने अटक केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांच्याकडे असलेली उद्योग खात्याचे मंत्रिपद काढून घेतले, तसेच त्यांना पक्षातून निलंबित करण्याच आले आहे. त्यांच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या मालकीच्या दोन फ्लॅटमधून कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम ईडीने जप्त केली होती. तसेच लाखो रुपये किमतीचे दागिनेही ईडीने ताब्यात घेतले आहेत. त्यांच्या तिसऱ्या फ्लॅटमधून कोणत्या गोष्टी ईडीने जप्त केल्या, याचा तपशील उपलब्ध झालेला नाही. 

वैद्यकीय तपासणीप्रसंगी आडमुठेपणातृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी व त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांना २३ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर दर ४८ तासांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी, असा न्यायालयाने आदेश दिला आहे. त्यानुसार जोका येथील ईएसआय रुग्णालयात तपासणीसाठी अर्पिता यांना आणण्यात आले होते. त्या कारमधून बाहेर यायला तयार नव्हत्या. 

सरतेशेवटी अर्पिता यांना कारमधून बाहेर काढण्यात आले. त्यांना व्हीलचेअरवर बसवून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी त्या रडत होत्या. पार्थ चॅटर्जी यांनाही व्हीलचेअरवरूनच रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले होते. मात्र, ते अर्पिता यांच्या आधी तिथे आले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयwest bengalपश्चिम बंगाल