शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

Hyderabad Rape-Murder Case : मॅकेनिकने पोलिसांना मदत केली; आरोपींनी साडे चार तास ढोसली दारू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 7:54 PM

निर्भया बलात्कार प्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींनी माफीचा अर्ज केला आहे.

हैदराबाद : हैदराबादमध्ये 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवरबलात्कार करून तरुणीला जाळून मारण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून चार दिवसांनी तेलंगाना सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

निर्भया बलात्कार प्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींनी माफीचा अर्ज केला आहे. यावर दिल्ली सरकारने हा अर्ज फेटाळून लावण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली आहे. तर तेलंगाना सरकारने घटनेच्या चार दिवसांत तीन पोलिसांना निलंबित करत बलात्कारचे खटले जलदगतीने चालविण्यासाठी न्यायालये उभारणार असल्याचा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, एका मेकॅनिकने पहिला पुरावा पोलिसांना दिला होता. त्याच्या मदतीने पोलिसांनी वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर जात सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींची ओळख पटविण्यात आली. यामुळेच पोलिसांना घटनेच्या 48 तासांत आरोपींना पकडण्याच यश आले. आरोपी मोहम्मद आरिफ, शिवा, नवीन आणि सी चेन्नकेवूल्लू यांनी बलात्कार करण्याआधी टोंडूपल्ली टोल प्लाझावर दारू प्यायली होती. सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री 9.30 वाजेपर्यंत ते दारू पित होते. महत्वाचे म्हणजे पिडीतेसाठी पसरवलेले जाळेच त्यांना तुरुंगात घेऊन गेले. टायर मॅकेनिकने पिडीतेचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांना सांगितले होते. पिडीतेच्या बहीणीने स्कूटरचा टायर पंक्चर झाल्याचे पोलिसांना सांगितले होते. यामुळे पोलिसांनी टायर पंक्चर काढणाऱ्यांना शोधायला सुरूवात केली होती. यावेळी एका टायरवाल्याने पोलिसांना एक लाल स्कूटर आल्याचे सांगितले होते. तेथूनच आरोपींचा सुगावा लागला. 

पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला होता. सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिलेल्या माहितीनुसार, '27 आणि 28 नोव्हेंबर दरम्यानच्या रात्री एक महिला बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात शमशाबाद पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात विलंब झाल्याचा आरोप झाला होता. त्याची सखोल चौकशी केली. या प्रकरणी हलगर्जी झाल्याचं चौकशीतून आलं आहे. त्याआधारे उपनिरीक्षक एम. रवी कुमार, हेड कॉन्स्टेबल पी. वेणुगोपाल रेड्डी आणि ए. सत्यनारायण गौड यांना पुढील आदेश मिळेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.' 

टॅग्स :Rapeबलात्कारTelanganaतेलंगणा