शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 500 सीसीटीव्ही कॅमेरे, 800 तासांचं फुटेज अन् 200 लोकांची चौकशी; समोर आलं भलतंच सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 11:06 IST

Crime News : हैदराबादमध्ये बलात्काराच्या दोन घटना समोर आल्या. मात्र तपासादरम्यान या घटनांची पोलखोल झाली आहे.

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या भयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. 500 सीसीटीव्ही कॅमेरे, 800 तासांचं फुटेज आणि 200 लोकांची चौकशी केल्यानंतर पोलिसांसमोर भलतंच सत्य आल्याची घटना घडली आहे. हैदराबादमध्ये बलात्काराच्या दोन घटना समोर आल्या. मात्र तपासादरम्यान या घटनांची पोलखोल झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे आणि अनेक तासांचं फुटेज पाहिलं. पण यानंतर चौकशीतून ही दोन्ही प्रकरणं खोटी असल्याचं समोर आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद पोलीस हे गांधी रुग्णालय आणि संतोष नगरमध्ये झालेल्या बलात्काराच्या प्रकरणाचा तपास करत होते. अत्यंत वेगाने या प्रकरणाचा तपास सुरू होता. पोलिसांनी वेगवेगळ्या टीम करून शोध सुरू केला होता. याच दरम्यान पोलिसांनी 500 सीसीटीव्ही कॅमेरे, 800 तासांचं फुटेज आणि 200 लोकांची चौकशी केली. मात्र यानंतर गांधी रुग्णालय आणि संतोष नगरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या दोन्ही घटना खोट्या असलेल्या समोर आलं आहे. पोलिसांच्या तपासामुळे आरोप करण्यात आलेली लोकं निर्दोष असल्याचं समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

विकृतीचा कळस! लग्नानंतर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या विवाहितेवर पुजाऱ्याचा बलात्कार; घटनेने खळबळ

राजस्थानच्या जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या विवाहितेवर पुजाऱ्याने बलात्कार केल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जयपूरमधील चंदवाजी पोलिसांनी याप्रकरणी मंदिरातील पुजाऱ्याला 15 तासांत अटक केली आहे. जयपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शंकर दत्त शर्मा दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्ट रोजी 23 वर्षीय विवाहितेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, गावातील मंदिराचे पुजारी गोपाळ उर्फ मुकेश जांगिड यांनी बलात्कार केला असं म्हटलं आहे. 

सायंकाळी महिला आपले वडील आणि पतीसह भेरुची मंदिरात लग्नानंतर दर्शनासाठी गेली होती. येथे पुजाऱ्याने रात्री होम-हवन करण्याच्या बहाण्याने तिला थांबायला सांगितलं. यानंतर पुजाऱ्याने तिचे पती आणि वडिलांना चौकात काही कामासाठी पाठवलं. पुजाऱ्याने ती एकटी असल्याचा फायदा घेतला आणि साधारण पहाटे 3 वाजता नशेचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. सकाळी जाग आल्यानंतर पुजारी तिला नातेवाईकांसह आपल्या कारमधून तिच्या गावी सोडायला आला. तेथे पोहोचल्यानंतर पीडितेने आपल्यासोबत झालेला प्रकार सांगितला. कुटुंबीय जेव्हा पुजाऱ्याला पकडण्यासाठी गेले, तेव्हा पुजारी कार सोडून घटनास्थळावरून फरार झाला होता. पीडितेने यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTelanganaतेलंगणाPoliceपोलिस