शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Video - संतापजनक! भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी; ज्युनिअर विद्यार्थ्याचं रॅगिंग, केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 10:15 IST

तेलंगणा भाजपाचे अध्यक्ष बंदी संजय कुमार यांच्या मुलावर मंगळवारी एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हैदराबादच्या महिंद्रा विद्यापीठात रॅगिंगचे आणखी एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियावर रॅगिंगचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तेलंगणाभाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांचा मुलगा बंदी साई भागीरथ त्याच्या मित्रांसह एका ज्युनिअर विद्यार्थ्याचं रॅगिंग करताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर साई भागीरथवर कारवाई करण्यात आली आहे.

तेलंगणाभाजपाचे अध्यक्ष बंदी संजय कुमार यांच्या मुलावर मंगळवारी एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा नेत्याच्या मुलावर अलीकडेच एका खासगी शैक्षणिक संस्थेच्या परिसरात मित्राच्या बहिणीशी गैरवर्तन केल्याबद्दल विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. हा मुलगा इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक तरुण दुसऱ्याला मारताना आहे.

रॅगिंगच्या या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांचा मुलगा बंदी साई भागीरथ आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुट्टी असल्याने वसतीगृह बंद असून, विद्यार्थी परतल्यानंतर चौकशीनंतर घटनेची वेळ कळेल. बंदी संजय यांचा मुलगा अनेक वादात अडकला आहे, ज्यामध्ये दिल्लीत शिकत असतानाच्या एका घटनेचा समावेश आहे, जिथे त्याला अशाच वर्तनासाठी कॉलेजमधून काढून टाकण्यात आले होते.

व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी भागीरथ श्री राम नावाच्या विद्यार्थ्याला शिवीगाळ करताना आणि मारहाण करताना दिसत आहे. या मारामारीत एक विद्यार्थी जखमी झाला आहे. बंदी संजय यांचा मुलगा साई भागीरथ याच विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत आहे. त्याने विद्यार्थ्याला मारहाण तर केलीच, पण अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. व्हिडिओमध्ये भागीरथ विद्यार्थ्याला धमकावताना आणि घटनेबद्दल कोणालाही सांगू नका किंवा त्याला ठार मारण्याचा इशारा देत असल्याचे देखील दिसत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBJPभाजपाTelanganaतेलंगणा