शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक संबंधास नकार दिल्याने पतीने पत्नीचा केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 21:17 IST

पत्नी के.बिंदु हिचा खून केल्यानंतर पती अशोक कुमार स्वत: पोलिसांच्या शरण जाऊन त्यांने खूनाची केली कबुली

ठळक मुद्देआपल्याला पत्नीने शारीरिक संबंधासाठी नकार देऊन उलससुलट बोलण्यास सुरू केल्याने याच्या रागात आपण तिचा खून केल्याची माहिती शरण आल्यानंतर अशोक यांनी वेर्णा पोलिसांना दिली.पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री ११ वाजता या खूनाची घटना घडली.

वास्को - दक्षिण गोव्यातील झरींत, झुआरीनगर येथे राहणाऱ्या अशोक पंचनाम कुमार यांने रविवारी (२४ मार्च) रात्री आपल्या पत्नीशी भांडण करून तिचा गळा आवळून खून केल्यानंतर स्वत: पोलिसांना शरणागत जाऊन ह्या खूनाची कबूली दिली. आपल्याला पत्नीने शारीरिक संबंधासाठी नकार देऊन उलससुलट बोलण्यास सुरू केल्याने याच्या रागात आपण तिचा खून केल्याची माहिती शरणागत आल्यानंतर अशोक यांनी वेर्णा पोलिसांना दिली.पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री ११ वाजता या खूनाची घटना घडली. ३५ वर्षीय अशोक कुमार यांने सोमवारी (२५ मार्च) मध्यरात्री बिर्ला पोलीस चौकीत जाऊन येथे असलेल्या पोलीसांना आपण आपली पत्नी के.बिंदु  (३९) हिचा गळा आवळून खून केला असल्याची माहिती देऊन तो पोलीसांच्या शरण आला. खूनाची माहिती मिळताच वेर्णा पोलीस अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन बिंदू हीच्या मृतदेहाचा पंचनामा करून नंतर तो शवचिकित्सेसाठी बांबोळीच्या गो.मॅ.कॉ इस्पितळात पाठवून दिला. रविवारी आपण आपल्या पत्नीशी शाररिक संबंध करण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र तिने यास विरोध करून आपल्याशी वाद घालण्यास सुरू केल्याची जबाब अशोक ने देऊन ह्याच रागाने आपण तिचा गळा आवळून खून केल्याचे पोलीसांना माहितीत सांगितले आहे. अशोक व त्याची पत्नी बिंदु यांना एक ५ वर्षीय मुलगी व ३ वर्षाचा मुलगा असून खून करण्याच्या वेळी त्यांची मुले घरात गाळ झोपली होती असे पोलिसांना तपासात उघड झाले आहे. तसेच बिंदु यांची आई के.व्ही मेरी ही त्यांच्या घराच्या बाजूलाच असलेल्या खोलीत राहत असून ही घटना घडली तेव्हा ती सुद्धा गाळ झोपेत असल्याचे पोलीसांना तपासात कळले आहे. अशोक हा मूळ ओडीसा येथील रहीवाशी असून मागच्या दहा वर्षापासून तो गोव्यात राहतो. तो टँकरवर क्लीनर म्हणून काम करत असल्याची माहिती पोलीसांना तपासणीच्या वेळी उघड झाली आहे. त्याची पत्नी बिंदू मूळ केरळ येथील असून सात वर्षापूर्वी दोघांचा विवाह झाला असल्याचे समजल्याची माहिती पोलीस निरीक्षक चोडणकर यांनी दिली.

ह्या खून प्रकरणात वेर्णा पोलीसांनी अशोक याच्याविरुद्ध भादस ३०२ कलमाखाली गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती निरीक्षक चोडणकर यांनी दिली. खून झालेल्या बिंदू हिच्या लहान मुलांना तिची आई केव्ही मेरी यांच्या हवाले करण्यात आलेले असल्याची माहिती पोलिसांनी पुढे दिली. दरम्यान या खून प्रकरणातील संशयित अशोक कुमार याला मंगळवारी वेर्णा पोलीस न्यायालयात उपस्थित करणार अशी माहिती पोलीसांनी दिली. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.आपली मुलगी बिंदु हिचा खून झाल्याचे तिची आई केव्ही मेरी हिला कळताच तिला याबाबत एके प्रकारचा धक्काच बसला. रविवारी रात्री आपण व आपल्या मुलीने एकत्र जेवण केले होते अशी माहिती मेरी हिने पत्रकारांना देऊन असे काय घडणार याची मूळच जाणीव लागली असल्याचे सांगितले. खून झाला आहे याची सुद्धा आपल्याला कल्पना सुद्धा लागली नसून पोलीसांनी घटनास्थळावर पोचून याबाबत आपल्याला कळविल्यानंतर आपल्या मुलीचा जावयाने खून केल्याचे उघड झाल्याचे केव्ही मेरी यांनी सांगितले.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकSexual abuseलैंगिक शोषण