चारित्र्यावर संशय घेऊन गर्भवती पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 19:05 IST2018-08-11T19:04:46+5:302018-08-11T19:05:47+5:30
: चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गर्भवती पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना तालुक्यातील कानंडखेड येथे आज सकाळी उघडकीस आली.
_201707279.jpg)
चारित्र्यावर संशय घेऊन गर्भवती पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
पूर्णा (परभणी) : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गर्भवती पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना तालुक्यातील कानंडखेड येथे आज सकाळी उघडकीस आली. यानंतर पतीनेही विषारी द्रव्य प्राशनकरून आत्महत्येचा प्रयत्न केला.
तालुक्यातील कानडखेड येथील कांचन लक्ष्मण चांडाळ (२५ ) या गर्भवती होत्या. मात्र, कांचन यांचा पती लक्ष्मण चांडाळ हा तिच्या चारित्र्यावर संध्या घेत असे. यातूनच लक्ष्मण याने कांचन हिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. यानंतर त्याने स्वतः विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर नांदेड येथे पुढील उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले, पो नि सुनील ओव्हाळ, स पो नि प्रवीण धुमाळ यांनी घटनास्थळी भेट दिली.