शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचे सहा तुकडे करून नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता पती पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 22:53 IST

आरोपी पोलिसांच्या जाळ्यातून सुटण्यासाठी नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. पण पोलिसांच्या सातर्कतेने त्याचा हेतू अयशस्वी केला.

ठळक मुद्देमुंबईच्या वांद्रे भागात कोंबडीच्या दुकानात काम करायचा. पण लॉकडाऊन दरम्यान मार्चमध्ये लखनौला परतला.

बाराबंकी - उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका महिलेचा मृतदेह ट्रॉलीच्या पिशवीत आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र, तपासादरम्यान धागेदोरे जोडून पोलीस आरोपी पतीपर्यंत पोचले. आरोपी पोलिसांच्या जाळ्यातून सुटण्यासाठी नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. पण पोलिसांच्या सातर्कतेने त्याचा हेतू अयशस्वी केला. त्यामुळे या पोलिसांच्या पथकाला एसपीने 25 हजार रुपयांचे बक्षीस दिले.

महामार्गावरील एका ब्रीफकेसमध्ये मृतदेह अनेक तुकड्यात सापडलालखनौ-अयोध्या महामार्गावरील कोतवाली नगर परिसरातील सफेदाबाद येथील केवाडी मोरजवळ एका ब्रीफकेस आणि बॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह सहा तुकड्यांमध्ये सापडला. मुंबईतील  आंबेडकर-टाटा-वाशाट रोड येथील भरतनगर येथील सम्राट शेखची मुलगी मालन बादशाह शेख उर्फ आयशा असे मृृृत महिलेचे नाव आहेत. लखनौच्या इंदिरानगरमध्ये आयशाची तिच्या पतीने हत्या केली आणि मृतदेहाचे सहा तुकडे केले. पोलिसांनी पोलिसांना आरोपीस इंदिरानगर पोलिस स्टेशन परिसरातील पाळत ठेवून अटक केली.5 जुलै रोजी हत्या केली होतीमिळालेल्या माहितीनुसार, आपापसात झालेल्या वादानंतर लखनौच्या इंदिरा नगरातील सेक्टर -14 येथे राहणारा पती समीर खानने 5 जुलै रोजी आयशाची हत्या लोखंडी रॉडने केली होती. समीर बलरामपूरच्या महाराजगंज पोलिस स्टेशन परिसरातील गुलहरीचा रहिवासी आहे. आणि मुंबईच्या वांद्रे भागात कोंबडीच्या दुकानात काम करायचा. पण लॉकडाऊन दरम्यान मार्चमध्ये लखनौला परतला. आयशाच्या हत्येनंतर समीरने बाजारातून चादर आणली आणि मृतदेह पॅक करण्यासाठी इतर साहित्य खरेदी केले. त्याच रात्री मृतदेहाचे सहा तुकडे ब्रीफकेस आणि बॅगमध्ये भरून कारमधून घेतले आणि महामार्गावर फेकले.अशाप्रकारे झााला खुलासाबाराबंकीचे एसपी डॉ. अरविंद चतुर्वेदी यांनी सांगितले की, ज्या ब्रीफकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यामध्ये पोलिसांना दोन महत्त्वपूर्ण संकेत सापडले. पहिली बॅगमध्ये आरोपीची जीन्स होती. ज्यात लखनौच्या उद्यानात जाण्यासाठी लागणारी तिकिटं आणि बॅगेत ठेवलेले वीज बिल होते. हे बिल इतके जुने होते की त्यावरील केवळ काही आकडे दिसत होते. त्यानंतर पोलिसांनी या दोन पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला.

विजेचे बिल एका महिलेच्या नावे होते. पोलिसांनी महिलेकडे पोहोचताच तिने समीरला घर विकल्याचे सांगितले. इथूनच पोलिसांना समीरचा नंबर मिळाला. त्यानंतर पोलिसांनी समीरच्या मोबाइलचा तपशील शोधला आणि त्याच्या ठीकानाबाबत चौकशी केली. मात्र, आरोपींनी तो मोबाइल बंद केला होता. असे असूनही, पोलिसांना आरोपींचा नवीन नंबर मिळाला. आणि आरोपीला अटक केली. एसपीने सांगितले की, आरोपी समीर खान नेपाळला पळ काढत होता.

टॅग्स :MurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटकMumbaiमुंबई