शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पतीने केली गळा आवळून हत्या, नालासोपाऱ्याच्या यशवंत गौरव रोड परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 11:25 IST

नालासोपाऱ्याच्या यशवंत गौरव रोडवरील विनय काॅम्प्लेक्समधील आनंद व्ह्यू बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या भाविक ठक्कर (२५) याने त्याची पत्नी मुन्नी (२२) हिची हत्या केली आहे.

नालासोपारा : शहरात २५ वर्षीय पतीने २२ वर्षीय पत्नीची रविवारी पहाटेच्या सुमारास गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. नालासोपारा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला ताब्यात घेतले असून चौकशीसह तपास करत आहे.नालासोपाऱ्याच्या यशवंत गौरव रोडवरील विनय काॅम्प्लेक्समधील आनंद व्ह्यू बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या भाविक ठक्कर (२५) याने त्याची पत्नी मुन्नी (२२) हिची हत्या केली आहे. भाविकची फेसबुकवरून या तरुणीशी ओळख झाली होती. या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाल्यानंतर त्यांनी सहा महिन्यांपूर्वी लग्न केले होते. भाविक ठक्कर हा गुजराती असून लग्नानंतर त्याची पत्नी बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या दोघांमध्ये खटके उडू लागल्याचे सूत्रांकडून कळते. भाविक याच्या पत्नीला काही कारणास्तव २० हजार रुपये हवे होते. या गोष्टीवरून त्यांच्यामध्ये भांडण झाले. या भांडणानंतर त्याने रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास रागाच्या भरात तिला जोरात तोंडावर चापट मारून सोफ्यावर पाडून दोन्ही हाताने पत्नीचा गळा दाबून हत्या केली आहे. त्यानंतर आरोपी पतीने ही घटना इमारतीतील इतर रहिवाशांना सांगितली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

पतीने पत्नीची घरगुती भांडणाच्या रागातून हत्या केली आहे. आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याची चौकशी व तपास सुरू आहे. - विलास सुपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिस