शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला १० वर्षांचा सश्रम कारावास; प्रेमविवाहानंतरही हुंड्यासाठी छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 21:03 IST

Crime News : आरोपी पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देपत्नीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

गडचिरोली : प्रेमविवाह करून पतीसोबत सुखी संसाराचे स्वप्न रंगवणाऱ्या विवाहितेचा पतीसह सासरच्या मंडळीकडून हुंड्यासाठी छळ सुरू झाला. या नैराश्यातून तिने आत्महत्या केली. याप्रकरणी आरोपी पतीला जबाबदार धरून जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. आरोपी मंगेश देवराव कन्नाके (२७) रा.गडचिरोली असे त्या आरोपीचे नाव आहे. (Husband sentenced to 10 years rigorous imprisonment for inciting wife to commit suicide)

न्यायालयीन सूत्रानुसार, येथील बाजारवाडी परिसरात राहणाऱ्या मंगेशचे शेफाली सुरेश खोब्रागडे हिच्याशी प्रेमसंबंध होते. त्यातूनच त्यांनी ५ जानेवारी २०१६ रोजी मार्कंडा देवस्थान येथे लग्न केले. आपल्या प्रेमाचा विजय झाल्याच्या आनंदात शेफाली संसाराचे स्वप्न रंगवत असतानाच तिचा भ्रमनिरास झाला. पतीसह सासू वनमाला कन्नाके, भासरे गणेश कन्नाके, नणंद पल्लवी बारापात्रे, तिचे पती विजय बारापात्रे आदींनी मिळून शेफालीला ५ ते ६ लाख रुपये हुंडा आणण्यासाठी तिचा छळ सुरू केला. त्यात मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात होता. त्यामुळे २८ मे २०१६ रोजी ती घरून निघून गेली आणि दि.२९ रोजी तिचा मृतदेह शहरातील तलावात सापडला.

शेफालीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. न्या.स्वप्निल एस.खटी यांनी सबळ पुरावा आणि युक्तीवाद यावरून आरोपी मंगेश कन्नाके याला आतहत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात १० वर्ष सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा दि.१ ला सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकिल एस.यु.कुंभारे यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी पो.निरीक्षक श्याम गव्हाणे व उपनिरीक्षक नारायण बच्चलवार यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोलीCourtन्यायालय