उत्तर प्रदेशातील बागपतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका सात मुलांच्या वडिलांनी अवैध संबंधांमुळे पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. यानंतर, त्याने पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस त्याला घेऊन त्याच्या घरी पोहोचले. महिलेच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. खालिद असे आरोपी पतीचे नाव आहे.
खालिद शहरातील घनश्यामदास मार्गावरील बर्फ कारखान्याजवळील कॉलनीत राहतो. गेल्या १८ वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याला सात मुले आहेत. त्याची पत्नी आसमा हिचे शेजारच्या एका तरुणाशी अवैध संबंध होते. गेल्या दहा दिवसांपूर्वी खालिदने त्याच्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या स्थितीत बघितले होते. खालीदच्या म्हणण्यानुसार, असे असूनही त्याने तिला समजावण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र तिने ऐकले नाही.
या प्रकरणावरून शुक्रवारी खालिद आणि आसमा यांच्यात मोठा वाद झाला. यानंतर, साधारणपणे दुपारी तीनच्या सुमारास त्याने आसमाचा गळा दाबून खून केला. यानंतर, तो संध्याकाळी ७.३० च्या सुमारास पोलिस स्टेशनला पोहोचला आणि त्याने पत्नीच्या हत्येची माहिती दिली. सीओ हरीश भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधांमुळे पतीने पत्नीची हत्या केली आहे. आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे.
हत्येनंतर मेहुणीला लावला फोन -खालिदने पत्नीच्या हत्येनंतर, मेहुणीला (साईस्ता ) फोन केला होता. मेहुणीशी बोलताना खालीद म्हणाला, "मी तुमच्या बहिणीला खूप वेळा समजावून सांगितले, पण तिने ऐकले नाही. मी तिची हत्या केली आहे. मी पोलिस स्टेशनला जात आहे. घरी ये. यानंतर साईस्ता बागपतला पोहोचली आणि पोलिसांना फोन कॉलची माहिती दिली. यासंदर्भात माहिती देताना बागपतचे सीओ हरीश भदोरिया म्हणाले, अनैतिक संबंधांमुळे पतीने पत्नीची गळा दाबू हत्या केली. त्याने स्वतःच आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याची चौकशी सुरू आहे.