शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आधी गर्भवती पत्नीसोबत काढला सेल्फी नंतर १ हजार फूट उंचीवरून दिला धक्का, वाचा कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 11:11 IST

आरोपी आहे की, सेल्फी घेतल्यानंतर हाकानने पत्नी सेमराला १ हजार फूट उंचीवरून धक्का दिला आणि ती खाली पडली. सेमराचा यात दुर्दैवी मृत्यू झाला.

तुर्कीमध्ये(Turkey) एका पतीने आपल्या गर्भवती पत्नीसोबत जे केलं ते वाचून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. सुंदर बटरफ्लाय व्हॅलीमध्ये (Butterfly Valley) त्याने अनेक तास घालवले. आणि त्यानंतर १ हजार फूट उंचीवरून तिला धक्का(Wife Murder) दिला. सात महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीला तसंच मरण्यासाठी सोडून दिलं. याचं कारण समोर आलं आहे.

Mirror च्या रिपोर्टनुसार ही घटना जून २०१८ तील आहे. या प्रकरणावर अजूनही पोलीस तपास करत आहे. दक्षिण-पूर्व तुर्कीचं शहर मुगला येथे राहणारा ४० वर्षीय हाकान आयसाल पत्नी सेमरा आयसालसोबत बटरफ्लाय व्हॅलीला फिरायला गेला होता. यावेळी त्यांनी डोंगरावर फोटोही काढले. आरोपी आहे की, सेल्फी घेतल्यानंतर हाकानने पत्नी सेमराला १ हजार फूट उंचीवरून धक्का दिला आणि ती खाली पडली. सेमराचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. हाकानला यानंतर अटक करण्यात आली. पतीने केलेल्या या कृत्यामागील कारण समोर येत आहे. (हे पण वाचा : विवाहित प्रेयसीने मजा केल्यानंतर लग्नास दिला नकार, लिव इनमध्ये राहणाऱ्या तरूणाने केली आत्महत्या...)

म्हणून केली हत्या

हाकानने काही दिवसांपूर्वी पत्नीच्या नावाने एक विमा काढला होता. विम्याचा हाकान हा एकमेव नॉमिनी आहे. विम्याच्या नियमांनुसार जर सेमराचा एखाद्या दुर्घटनेत आकस्मिक मृत्यू झाला तर नॉमिनीला ४० हजार लीराचा क्लेम मिळेल. (हे पण वाचा : खळबळजनक! ब्रेकअपनंतर तरूणीने बॉयफ्रेन्डला घरी बोलवलं, मग होणाऱ्या पतीच्या मदतीने केली त्याची हत्या..)

सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. वकिलांनी दावा केला की, हाकान तीन तास टेकडीवर यासाठी बसून राहिला की, आजूबाजूला कुणी नाही ना हे बघू शकेल. जशी त्याला संधी मिळाली त्याने सेमराला १ हजार फूट उंचीवरून खाली ढकललं.  यानंतर या निर्दयी पतीने ४० हजार लीरा म्हणजे साधारण ४० लाख रूपयांचा क्लेम केला. पण तपासादरम्यान तो रद्द करण्यात आला.

कुटुंबियांनी केला मोठा खुलासा

तुर्कीच्या स्थानिक कोर्टाने हाकानला तुरूंगात टाकण्याचा आदेश दिला आहे. तर दुसरीकडे मृत महिलेच्या कुटुंबियांनी खुलासा केला आहे की, समेराच्या पतीने तिच्या नावाने तीन लोनही घेतले होते. कदाचित ते हडपण्यासाठीच त्याने तिची हत्या केली. कुटुंबियांनी सांगितले की, सेमराला उंचीची भीती वाटत होती. तरी मुद्दामहून तो तिला १ हजार फूट उंच डोंगरावर घेऊन गेला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनInternationalआंतरराष्ट्रीय