शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

Crime News:स्वयंपाक उशिरा दिल्याचा राग, ८० वर्षीय वृद्धाने ७८ वर्षीय पत्नीला हात-पाय बांधून जिवंत जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 14:59 IST

मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

सवना: सेनगाव तालुक्यातील सवना येथे एका वुध्द पतीने (वय. ८०) पत्नीला (वय. ७८)  स्वयंपाक उशीरा केल्याच्या रागात हात-पाय बांधून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २५ फेब्रुवारी २०२२ च्या मध्यरात्री १ वाजता घडलेल्या या घटनेप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलियांनी आरोपी कुंडलिक शिवराम नायक याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सवना येथे कुंडलिक शिवराम नायक (वय. ८०) व त्यांची पत्नी सुंदराबाई कुंडलिक नायक (वय. ७८) हे दोघे राहतात. त्यांना पाच मुली असून, त्या सर्वांचे लग्न झाले आहेत. त्यापैकी एक मुलगी सवना येथे राहते. गावात दोघे पती-पत्नी घरी राहत असत. शुक्रवारी दुपारी स्वयंपाक उशिरा का केला या कारणावरुन पती- पत्नीत वाद झाला. त्यातच आराेपी हा रागीट स्वभावाचा असल्याने हा राग मनात ठेवत, त्याने रात्रीला पती सुंदराबाईचे हातपाय बांधून त्यांच्या अंगावर रॉकेल व पऱ्हाट्याच्या साह्याने पेटवून दिले.

अचानक रात्रीला या घरातून धूर निघत असल्याचे शेजारच्या लक्ष्यात आले. शेजारच्यांनी त्या घराकडे धाव घेतली. आतून दरवाजा लावलेला असल्याने ग्रामस्थांनी दरवाजा ताेडून आत प्रवेश करताच, वृध्द महिलेच्या अंगाला आग लागल्याचे दिसुन आले. या आगीत सदरील महिला ८० टक्के भाजली असताना, तिचा पती झाेपेचे साेंग घेत बाजुलाच हाेता. शेजारच्यांनी सुंदराबाईला तातडीने उपचारासाठी वाशिम येथे नेले. परंतु महिला जास्तीच भाजली असल्याने अकोला येथे दाखल केले. यादरम्यान उपचार सुरू असताना २६ फेब्रुवारीला सकाळी ४ वाजता त्या महिलेला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घाेषित केले.या घटनेची माहिती मिळताच, पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील, उपनिरीक्षक बाबूराव जाधव, राहुल गोटरे, किसन डवरे, गजानन बेडगे, काशिनाथ शिंदे, विजय महाले, शंकर गायकवाड, विजय कालवे, खाेकले यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.     पाच बहिणीपैकी सर्वात लहान मुलीने दिली फिर्याद

सवना येथील कुंडलिक शिवराम नायक व त्यांची पत्नी सुंदराबाई कुंडलिक नायक यांना पाच मुली आहेत. त्यापैकी सर्वात माेठी मुलगी तामसी तर दुसरी मुलगी सवना येथे राहते. तर अनुक्रमे केंद्रा बु.,चरणगाव येथे राहतात. त्यापैकी सर्वात लहान मुलगी जरिता पंजाब वाघ रा. शिरपूर जैन जि. वाशिम येथे राहत असून, तिच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात कुंडलिक नायक यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कुंडलिक यास अटक केली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस