शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत केली पतीची हत्या, मग इंदूरमध्ये नेऊन मृतदेह केला नष्ट, मुलगी आणि जावयाच्या मदतीने घडवलं भय़ानक हत्याकांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 16:42 IST

Murder Mystry : पोलिसांनी इंदूर ते मुंबई सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तिन्ही आरोपी पकडले गेले.

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये सुटकेसमध्ये मृतदेह सापडल्याप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. या तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी, मुलगी आणि जावयाला अटक केली आहे. या प्रकरणातील मृताची पत्नी मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जिने स्वतःच्या पतीची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ६०० किमी प्रवास करून तो इंदूरला आणला. त्यानंतर निर्जन शेतात पेट्रोल टाकून मृतदेह जाळला. पोलिसांनी इंदूर ते मुंबई सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तिन्ही आरोपी पकडले गेले.खरं तर, इंदूरच्या राजेंद्र नगर पोलीस स्टेशन परिसरात रविवारी सकाळी पोलिसांनी निहालपूर मुंडी येथील एका शेतातून ट्रॉली बॅगमधून अर्धा जळालेला मृतदेह सापडला होता. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी कल्याण येथील ६० वर्षीय राजकुमारी मिश्रा आणि तिचा जावई उमेश शुक्ला, मुलगी नम्रता शुक्ला यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा मृतदेह राजकुमारी मिश्रा यांचे पती संपतलाल मिश्रा यांचा असल्याचे निष्पन्न झाले. कडक चौकशीत महिलेने सांगितले की, तिनेच पतीचा डोक्यात वार करून खून केला आहे. घटनेनंतर राजकुमारीने मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून तिचा जावई उमेश यांच्या गाडीच्या डिकीमधून इंदूरला आणला आणि निर्जन जागा पाहून तो पेटवून दिला.मुख्य आरोपी महिलेचा जावई उमेश हा मुंबईतील एका नामांकित मोबाईल कंपनीत काम करतो. पोलिसांनी गाडी तपासू नये म्हणून त्यांनी मुलांना चेकपोस्टवर बसवले होते. पोलिसांनी टोलनाके, हॉटेल आणि ढाब्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनास्थळाच्या आजूबाजूला एक कार दिसली. पोलिसांनी टोलनाक्यांवर लिंक जोडली आणि इंदूर पोलिस उमेशपर्यंत पोहोचले. इंदूरमध्ये त्याचे लोकेशन सापडले असता तो घटनास्थळी उपस्थित असल्याची माहिती समोर आली. बुधवारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेताच प्राथमिक चौकशीत तो हतबल झाला. पोलिसांनी जेव्हा राजकुमारीला ताब्यात घेतले तेव्हा तिने सांगितले की, तिचा पती संपतलाल मिश्रा याच्याशी वाद होत होता. शनिवारी झालेल्या बाचाबाचीनंतर तिने ढकलले असता तो डोक्यावर  पडला. बेशुद्ध पडल्यावर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी बॅगेत भरले. संपूर्ण घटना मुलगी नम्रता हिला सांगितली आणि उमेशने मिळून मृतदेह गाडीत ठेवला आणि इंदूरला जाळला. सध्या हत्येचे तीन आरोपी तुरुंगात आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशMumbaiमुंबईDeathमृत्यूArrestअटक