शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 12:30 AM

पोलिसांनी पत्नीसह तिघांना केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पतीकडून वारंवार होत असलेल्या मारहाणीला कंटाळून अनैतिक संबंध ठेवलेल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या रुक्सार शेख (३०) या पत्नीसह तिघांना अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली. सुरुवातीला धागादोरा नसताना मोठ्या कौशल्याने मुंब्रा पोलिसांनी या खुनाचा छडा लावला.

मुंब्रा खाडीवरील जुन्या पुलाजवळील एमएम व्हॅलीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह २७ फेब्रुवारीला सकाळी आढळला होता. त्याच्या गळ्यावर चॉपरने वार करून त्याचा खून केला होता. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांत अनोळखी व्यक्तीविरुद्ध खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या खुनाच्या तपासासाठी विशेष पथकांची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. 

दरम्यान, हा मृतदेह अहमद याचा असल्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. सहायक पोलीस आयुक्त नीता पडवी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, निरीक्षक रामचंद्र वळतकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले आणि शहाजी शेळके यांच्या पथकाने अहमद शेखची पत्नी रक्सार आणि मेव्हणी रेश्मा (२८) यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यातूनच त्यांच्यावर या पथकाचा संशय बळावला. त्यानंतर पथकाने त्यांच्यावर नजर ठेवली. तेव्हा रुक्सारचा प्रियकर मोहम्मद नफील शेख याच्याकडे केलेल्या चौकशीत अहमद याची पत्नी रुक्सार आणि मेव्हणी रेश्मा (२८) यांच्याशी संगनमत करून अहमद याचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर मोहम्मद शेख, रुक्सार आणि रेश्मा या तिघांना २ मार्चला मुंब्रा पोलिसांनी अटक केली.

असा घडला प्रकारअहमद हा त्याची पत्नी रुक्सार हिला नेहमी क्षुल्लक कारणावरून मारहाण करत होता. याच मारहाणीला कंटाळून तिने प्रियकर मोहमद आणि रश्मी यांच्याशी २४ फेब्रुवारीला पतीला मारण्याचा कट केला. याच कटातून २७ फेब्रुवारीला त्याचा खून करण्यात आला. मात्र, मुंब्रा पोलिसांनी केलेल्या तपासातून हा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस