पतीने पत्नीची केली हत्या, रक्ताळलेली कुऱ्हाड घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 13:13 IST2023-04-14T13:12:55+5:302023-04-14T13:13:51+5:30

मन्योर गावातील रोशनलाल याला पत्नी मीराच्या चारित्र्यावर संशय होता. याच गोष्टीवरून बुधवारी जेवताना पती-पत्नी दोघांमध्ये वाद झाला.

Husband kills wife, reaches police station directly with bloody axe at lakhimpur khiri | पतीने पत्नीची केली हत्या, रक्ताळलेली कुऱ्हाड घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले, मग...

पतीने पत्नीची केली हत्या, रक्ताळलेली कुऱ्हाड घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले, मग...

लखीमपूर खीरी - मन्योर गावात पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची कुऱ्हाडीने हत्या केली आहे. या घटनेनंतर स्वत: आरोपी पती रक्ताळलेली कुऱ्हाड घेऊन पोलीस ठाण्यात पोहचला. या व्यक्तीला पाहून पोलीसही हादरले. आरोपीने मी पत्नीचा खून करून आलोय. तिचा मृतदेह घरी पडलाय असं सांगितले तेव्हा पोलीस हैराण झाले. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करत या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. 

मन्योर गावातील रोशनलाल याला पत्नी मीराच्या चारित्र्यावर संशय होता. याच गोष्टीवरून बुधवारी जेवताना पती-पत्नी दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की रोशनलालने घरातील कुऱ्हाड उचलली आणि पत्नीवर वार केला. या हल्ल्यात मीराच्या गळ्याला गंभीर जखम झाली. त्यात घटनास्थळीच पत्नी मीराचा मृत्यू झाला. 

या घटनेनंतर कुऱ्हाड घेऊन आरोपी पती पोलीस ठाण्यात पोहचला. तिथे त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. घरात मृतदेह पडलाय असं त्याने पोलिसांना सांगितले. आरोपी पतीच्या हातातील रक्ताळलेली कुऱ्हाड पाहून पोलिसही हैराण झाले. रोशनलाल याला ताब्यात घेत पोलीस घटनास्थळी पोहचले. मृतदेह पोलिसांनी पोस्टमोर्टमला पाठवला. तपासानंतर पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड जप्त केली. या प्रकरणात मुलीच्या तक्रारीवरून आरोपी पतीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हत्येचे कारण पतीने पत्नीच्या चारित्र्यावर घेतलेला संशय आहे. सध्या विविध अँगलने पोलीस तपास करत आहेत. 

गाववाल्यांच्या माहितीनुसार, पती आणि पत्नी यांच्यात नेहमी भांडण होत असे. आरोपी पती त्याच्या पत्नीकडे संशयाच्या नजरेने पाहायचा. अनेकदा भांडण झाल्यानंतर पत्नी माहेरी निघून जायची. दीड वर्षापासून पत्नी माहेरी आहे. रोशनलालच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मध्यस्थी करत दोघांमधील वाद मिटवला होता. दीड महिन्यापूर्वी पत्नी मीरा सासरी आली होती. परंतु आरोपी पतीच्या स्वभावात बदल झाला नाही. बुधवारी रागाच्या भरात आरोपी पतीने पत्नीची हत्या केली. या घटनेमुळे मीराच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

Web Title: Husband kills wife, reaches police station directly with bloody axe at lakhimpur khiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.