किरकोळ भांडणातून पतीने केला पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2022 11:16 IST2022-03-19T11:16:41+5:302022-03-19T11:16:57+5:30

चाळीसगाव जि.जळगाव :  किरकोळ भांडणातून डोक्यात कुऱ्हाड टाकून पतीने पत्नीचा खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजता मेहूणबारे ...

Husband kills wife over minor altercation | किरकोळ भांडणातून पतीने केला पत्नीचा खून

किरकोळ भांडणातून पतीने केला पत्नीचा खून

चाळीसगाव जि.जळगाव :  किरकोळ भांडणातून डोक्यात कुऱ्हाड टाकून पतीने पत्नीचा खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजता मेहूणबारे ता.चाळीसगाव येथील शेतात घडली. पतीस अटक करण्यात आली आहे. 

निनूबाई कुवरसिंग पावरा, (३६) असे मृत महिलेचे नाव आहे.  पती कुवरसिंग चत्तरसिंग पावरा (४१, रा. मोहरतमाल,  बडवानी, मध्य प्रदेश) याच्यासह सुजाता महाजन यांच्या मालकीच्या शेतामध्ये ती राहत होती. 
शुक्रवारी रात्री निनूबाई ही दारु प्याली होती. याबाबत कुवरसिंग याने जाब विचारला. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात  पतीने निनूबाई हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून तिचा खून केला.

Web Title: Husband kills wife over minor altercation