भोम अडकोण येथे गळा आवळून पतीने केला पत्नीचा खून
By आप्पा बुवा | Updated: April 16, 2023 14:47 IST2023-04-16T14:45:57+5:302023-04-16T14:47:35+5:30
नवरा बायको दोघांनाही दारूचे व्यसन असल्याची माहिती

भोम अडकोण येथे गळा आवळून पतीने केला पत्नीचा खून
अप्पा बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: अगोदर बेदम मारहाण करून नंतर गळा आवळल्याने पत्नीचा जागीच मृत्यू होण्याची घटना शुक्रवारी भोम अडकोण येथे रात्री घडली आहे. सविस्तर वृत्तानुसार अडकोण येथील गोपाळकृष्ण मंदिरा शेजारी भाड्याच्या घरात राहणारे मेलो लाकारा(वय 48,) व त्योफिल लकारा (वय 43) यांच्यात नेहमी विविध कारणाने भांडणे व्हायची. नवरा बायको दोघांनाही दारूचे व्यसन असल्याची माहिती मिळाली आहे.
शुक्रवारी सुद्धा त्यांच्यात कदाचित भांडण झाले असणार. सदर भांडणात त्योफिलल याने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली या मारहाणीत तिचे चार दात सुद्धा निखळून पडले. त्यानंतर गळा आवळून त्याने तिचा खून केला. खून केल्यानंतर रात्रभर तो मृत पत्नीच्या बाजूलाच होता. सकाळी उठून त्याने तिचा मृत्यू नैसर्गिक मृत्यू म्हणून ठरवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्याच्या प्रयत्नाला कोणीच दाद दिली नाही.
सदरची बातमी पोलिसांना मिळतात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृत झालेल्या मेलो लखारा हिला अगोदर बेतकी खांडोळा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी उत्तरिय तपासणी साठी मृतदेह गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवून दिला. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीस उपनिरीक्षक आदित्य वेळीप यांनी याबाबतीत तक्रार दाखल करून घेतली असून पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर व पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर हे ह्या बाबतीत पुढील तपास करत आहेत. त्योफुल नकारा व मेलो नकारा है दोघेही झारखंड येथील असून त्योफिल हा गवंडी काम करायचा तर मेलो ही ओल्ड गोवा येथे घरकाम करायची.