शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

संपत्तीसाठी २० लाखांची सुपारी देऊन पतीची हत्या, पत्नीसह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 13:31 IST

कळंबोली सेक्टर ६ येथील उद्यानात ट्रान्सपोर्ट व्यावसायिक जसपाल निस्तर सिंग खोसा (४८) यांचा मृतदेह आढळला होता. या हत्येचा उलगडा करून गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांची पत्नी व इतर दोघांना अटक केली.

नवी मुंबई : पैशांसाठी नेहमी कटकट करून वाद घालणाऱ्या व्यावसायिकाची त्याच्या पत्नीने २० लाखांची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घडना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी पत्नीसह तिघांना अटक केली. आरोपी तिच्या माहेरातील परिचयातील आहेत. पतीच्या निधनानंतर संपत्ती व खात्यातील रक्कम आपल्यालाच मिळणार असल्याचे सांगून तिने हत्येचा कट रचला होता.कळंबोली सेक्टर ६ येथील उद्यानात ट्रान्सपोर्ट व्यावसायिक जसपाल निस्तर सिंग खोसा (४८) यांचा मृतदेह आढळला होता. या हत्येचा उलगडा करून गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांची पत्नी व इतर दोघांना अटक केली.

पती-पत्नीत सतत सुरू हाेता वादगुन्हे शाखा कक्ष २चे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील, सहायक निरीक्षक प्रवीण फडतरे, संदीप गायकवाड, उपनिरीक्षक वैभवकुमार रोंगे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. हत्येनंतर दोघा संशयितांची माहिती मिळाली होती. त्यावरून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिल्लीला जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी जसपाल यांची पत्नी दलजित खोसा (३८) हिच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार तिघांनाही अटक केली आहे. पत्नी दलजित हिचे वागणे व इतर कारणांनी जसपाल यांनी तिला पैसे देण्याचे थांबवले होते. त्यावरून दोघांमध्ये सतत वाद सुरू होता. 

पंजाबमध्ये माहेरी रचला हत्येचा कटदलजित पंजाबमधील माहेरी गेली असता तिथे तिने सुखजिंदर सिंग (२३) व एकम ओनकार सिंग (२९) यांच्यासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला होता. पतीची हत्या केल्यास २० लाख रुपये व पतीच्याच ट्रान्सपोर्ट व्यवसायात नोकरीदेखील देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार दोघेजण कळंबोली सेक्टर ६ येथील उद्यानात येऊन थांबले होते. त्याचवेळी दलजित हिने घरातील कुत्र्याला फिरून आणण्याच्या बहाण्याने पतीला तिथे पाठवले असता दोघांनी चाकूने वार करून पळ काढला होता.

स्वतःच्या मुलालाही दिली धमकीपतीच्या हत्येप्रकरणी दलजित हिला पोलिसांनी अटक केल्यानंतर तिच्या दोनपैकी एका मुलाने केलेल्या कृत्याबद्दल जाब विचारला. यावेळी तिने ‘नशीब समज, तू वाचलास’ अशी धमकी दिल्याचे समजते. यावरून वेळ पडल्यास ती स्वतःच्या मुलांच्या हत्येच्या तयारीत होती का? असाही प्रश्न निर्माण होत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारMONEYपैसाPoliceपोलिस