नवी दिल्ली - हरियाणामधील पानीपत जिल्ह्यात एक धक्कादायक गुन्हा समोर आला आहे. येथे एका पतीला त्याच्या पत्नीचा एवढा तिटकारा येऊ लागला की त्याने थेट तिच्या हत्येचे कारस्थान रचले. आधी त्याने पत्नीच्या नावावर दोन वाहने घेतली. (Husband Killed Wife) त्यानंतर त्या वाहनांचा हप्ता माफ व्हावा आणि विम्याचे १५ लाख रुपये मिळावे, यासाठी पत्नीला रस्त्यावर भरधाव ट्रकसमोर ढकलले. त्यानंतर आरोपीने या हत्येला अपघाताचे रूप देऊन पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल केली. (Husband hatches conspiracy to grab Rs 15 lakh from wife's insurance, and then He Murder his Wife )
मात्र सीआयए-थ्री-पोलिसांनी विविध पैलूंवरून सखोल तपास करून गुन्ह्याचा छडा लावला. त्यानंतर पोलिसांनी सबळ पुराव्यांसह आरोपी पतीला बेड्या ठोकल्या. सीआयए-थ्री चे प्रभारी इन्स्पेक्टर अनिल छिल्लर यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती देताना सांगितले की, ‘’गेल्या ३० जून रोजी औद्योगिक सेक्टर २९ मध्ये एका तरुणाने त्याच्या पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याची तक्रार दिली होती. त्या तक्रारीत त्याने म्हटले होते की, त्याची पत्नी जरिना आजारी पडल्याने तो तिला उपचारांसाठी कारमध्ये बसवून पानीपत येथे जात होता. त्याचवेळी रोहतक बायपास येथून पुढे गेल्यावर पत्नीला उलटी झाल्याने मी कार रस्त्याशेजारी उभी केली. तेव्हा जरिना खाली उतरून फिरत होती. त्याचवेळी एका भरधाव ट्रकने तिला धडक दिली. त्यात तिचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तर चालक ट्रकसह घटनास्थळावरूवन फरार झाला. मात्र ट्रकचा नंबर नोंदवून घेता आला नाही, असा जबाब ेदिला होता.दरम्यान, या महिलेचा मृतदेह पोलिसांनी सिव्हिल रुग्णालयात नेऊन पोस्टमार्टेम करून कुटुंबीयांच्या ताब्यात दिले होते. तसेच नसीब याच्या तक्रारीवरून अज्ञात ट्रकचालकाविरोधात तक्रार दाखल केली होती. या तपासादरम्यान, विविध पैलूंचा विचार केला असता मृत महिलेचा पती आणि या प्रकरणातील तक्रारदार नसीब याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता नसीब याने पत्नीची हत्या केल्याचे मान्य केले. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपी नसीब याने त्याला पत्नी आवडत नसेत त्यामुळेच कटकारस्थान रचून पत्नीची हत्या करून तिच्या विम्याचे पैसे हडपण्याचा डाव आखला होता, असे मान्य केले.