शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

दिसायला सावळी म्हणून विवाहितेला जिवंत जाळलं; अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 19:39 IST

चिमुकला झाला पोरका; पोलिसांनी सासू लीलाबाई वायले आणि पती संगम वायले या दोघांना पोलिसांनी अटक केली 

ठाणे - दिसायला सावळी आहे आणि लग्नात हुंडा दिला नाही म्हणून एका विवाहितेला जिवंत पेटवून दिल्याची संतापजनक घटना अंबरनाथ तालुक्यात हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पेटवून देणारे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ही आत्महत्या असल्याचा बनाव देखील रचला. याप्रकरणी पोलिसांनी सासू लीलाबाई वायले (वय -६०) आणि पती संगम वायले (वय - २४) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, दिड वर्षांचा चिमुकला आईच्या मायेला मुकला आहे. 

वैशाली वायले (वय - २५) ही काकडवाल गावातील दुधकर कुटूंबियांची लेक. बीएससी झालेल्या वैशालीचे दोन वर्षांपूर्वी अंबरनाथ तालुक्यातील वसार गावात संगम वायले याच्याबरोबर लग्न  झाले. मात्र, विवाह प्रसंगी मानपान आणि दागिने न दिल्याने तिचा पती संगम आणि सासू लीलाबाई वैशालीच्या अतोनात छळ करीत होती. तू दिसायला सावळी आहे मला शोभत नाही असं बोलून पती हिणवत होता. तुझ्या घरच्यांनी आम्हाला ठरल्याप्रमाणे हुंडा दिला नाही असा वैशालीचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. अखेर २० जुलैला रात्री १२. ३० च्या सुमारास वैशालीला तिच्या पती आणि सासूने मारहाण करून जिवंत पेटऊन दिले अशी माहिती हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पालांगे यांनी दिली. पुढे त्यांनी सांगितले की, आगीत होरपळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एवढ्यावरच न थांबता नवरा संगम याने खोलीच्या आतून लॉक करून खिडकीतून पळून जाऊन ऑफिस गाठले आणि वैशालीने आत्महत्या केलाच बनाव रचला होता. तसेच  वैशाली ही उच्च शिक्षित होती तिच्या खुप आकांशा होत्या. मात्र, सासरचे लोक चांगली वागणूक देत नसल्याने ती हताश झाली होती. तिला जिवंत जाळल्यावर तिच्या सासारच्यांनी वैशालीने स्वतः पेटवून घेतल्याचे वैशालीच्या घरच्यांना सांगितले. आपल्या पोटच्या मुलीला सासरच्यांनी जिवंत पेटवून दिल्याने दुधकर कुटुंब दुःखात बुडाले आहेत.

पोलिसांनी घटनास्थळाचा आढावा घेतल्यानंतर त्यांना थोडा संशय आला होता. त्यांनी वैशालीचा मृतदेह मुंबईला पाठवला होता तिथे तिच्या अंगावर मारहाणीच्या जखमा असल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले. त्यानंतर हिल लाईन पोलिसात पती संगम आणि सासू लीलावतीच्या विरोधात हत्येचा आणि हुंडा बळीचा गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वैशालीला दीड वर्षाचा मुलगा आहे. मात्र तो आता आईच्या मायेला पोरका झाला आहे. सासू लीलाबाई आर्थर रोड कारागृहात खडी फोडत असून पती संगम हा पोलीस कोठडीत आहे. 

 

 

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणेambernathअंबरनाथPoliceपोलिसArrestअटक