शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पतीने घेतला गळफास, त्याआधी बंगळुरूत पत्नीने संपवलं जीवन; नेमकं घडलं तरी काय?

By दयानंद पाईकराव | Updated: December 27, 2025 18:57 IST

वर्धा रोडवरील हॉटेल रॉयल व्हिलाच्या खोली क्रमांक १०३ मधील घटना

दयानंद पाईकराव, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: घरात नेहमी होत असलेल्या भांडणातून पत्नीने बंगळुरूत गळफास घेतला. तिच्या माहेरच्या मंडळीने पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून पतीला धमकी दिली. त्यामुळे मोठा भाऊ व आईसोबत नागपुरात आलेल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वर्धा रोडवरील हॉटेल रॉयल व्हिलाच्या खोली क्रमांक १०३ मध्ये शनिवारी रात्री १२.१५ वाजताच्या सुमारास घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

सुरज शिवन्ना (३०, रा. बीईएल ले आऊट, विद्यारन्यपुरा बंगळुरु कर्नाटक) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. तो बंगळूरमध्ये हॉटेल चालवितो. दीड महिन्यांपूर्वी त्याचे गानवी उर्फ राशी या तरुणीसोबत लग्न झाले होेते. परंतु लग्नापासून त्यांच्यात नेहमीच वाद होत असत. याच वादातून गानवी उर्फ राशीने आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर २२ डिसेंबरला गानवीच्या माहेरची मंडळी सूरजच्या घरी आले. त्यांनी सूरजला धमकी दिली. त्यामुळे सुरज घाबरला होता. तो आपली आई जयंती शिवन्ना (६०) व मोठा भाऊ संजय शिवन्ना (३६) या दोघांना घेऊन हैद्राबादला व तेथून नागपुरात आला. तिघांनी २६ डिसेंबरला रात्री ९.३० वाजता वर्धा रोडवरील हॉटेल रॉयल व्हिलातील १०२ व १०३ या दोन खोल्या बुक केल्या.

खोली क्रमांक १०३ मध्ये आतील खोलीत सूरज तर बाहेरील खोलीत त्याची आई शिवन्ना आराम करत होती. भाऊ संजय खोली क्रमांक १०३ मध्ये होता. रात्री १२.१५ वाजता सुरजची आई जयंती या संजयच्या खोलीत आल्या. त्यांनी सूरजने पंख्याला दुपट्टा बांधून गळफास घेतल्याचे संजयला सांगितले. त्यानंतर संजय खोलीत गेले असता त्यांना आपला भाऊ सुरज पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. मुलाने गळफास घेतल्याचे पाहून त्याच्या आईनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु संजय यांनी आईला रोखले. सुरजच्या आत्महत्येबाबत हॉटेल व्यवस्थापनाला माहिती देण्यात आली. लगेच सोनेगाव पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्स. हॉस्पीटलला पाठविला. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur: Husband Commits Suicide After Wife's Death in Bengaluru

Web Summary : Following constant marital disputes, a woman in Bengaluru died by suicide. Accused and threatened by her family, the husband fled to Nagpur with his mother and brother. He then tragically took his own life in a hotel room. Police are investigating the case.
टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदार