शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आधी Love Marriage, मग पतीनं लिहून घेतली सुसाइड नोट, नंतर फासावर लटकवलं अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 12:10 IST

या दोघांचे काही काळ सर्व काही सुरळीत सुरू होते, मात्र नंतर पीडितेच्या पतीने कुटुंबासह तिचा छळ सुरू केला. एवढेच नाही, तर मुलीला जातीवाचक शिवीगाळही केली जाऊ लागली होती. हे सातत्याने सुरू होते आणि तीही हे सर्व सहन करत राहिली, असा आरोप आहे.

पानिपत - हरियाणातील पानिपत येथून पती-पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. ही घटना वाचून तुमच्याही अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. पानिपतच्या न्यू हाऊसिंग बोर्ड कॉलनीत राहणाऱ्या एका तरुणीने शहरातील विकास नगरमध्ये राहणाऱ्या नीरजसोबत प्रेमविवाह केला होता. हे तिचे दुसरे लग्न होते. मात्र, नीरजच्या कुटुंबीयांना हा आंतरजातीय विवाह मान्य नव्हता. यामुळे दोघेही पती-पत्नी वेगळे राहू लागले होते.

या दोघांचे काही काळ सर्व काही सुरळीत सुरू होते, मात्र नंतर पीडितेच्या पतीने कुटुंबासह तिचा छळ सुरू केला. एवढेच नाही, तर मुलीला जातीवाचक शिवीगाळही केली जाऊ लागली होती. हे सातत्याने सुरू होते आणि तीही हे सर्व सहन करत राहिली, असा आरोप आहे.

मग एक दिवस… -पीडितेच्या म्हणण्यानुसार, एके दिवशी तिच्या पतीने तिला पाण्यात नशेचा पदार्थ विरघळून पाजला आणि नंतर जबरदस्तीने सुसाईड नोट लिहायला लावली. पीडितेने सांगितले की, यानंतर पतीने तिला फासावर लटकवले आणि फरार झाला. यानंतर, जेव्हा तिच्या मुलीने हे पाहिले तेव्हा तिने तिच्या मामाला आणि आजीला याची माहिती दिली. यानंतर तिला फासावरून खाली उतरवून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात तब्बल 15 दिवस ती जीवन-मरणाची लढाई लढत होती. तीचा जीव वाचला असला तरी, ती सध्या अंथरुनालाच खिळून आहे.

काय म्हणाले पोलीस -याप्रकरणी चांदनीबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी मनजीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या तक्रारीवरून भादंवि कलम 307 आणि 328 नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. 

काय म्हणाले डॉक्टर -ममतावर उपचार करत असलेले डॉ. गौरव श्रीवास्तव यांनी सांगितले की, जेव्हा तिला रुग्णालयात आणले गेले तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती आणि तिला श्वास घेण्यासही त्रास होत होता. मात्र, आता प्रकृतीत बर्‍याच प्रमाणावर सुधारणा झाली आहे. मात्र, तिला उठण्यासाठी आणि चालण्यासाठी अद्यापही त्रास होत आहे.

आता पीडिता तिच्या माहेरी आहे. तसेच, तिने न्याय मिळावा आणि दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी