शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरून केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात पतीचा मृत्यू; पत्नी गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 16:40 IST

मालाडमधील घटना

ठळक मुद्देकनोजिया आणि त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून खटके उडायचे.नंदलाल कनोजिया (४५) आणि त्यांची पत्नी ऊर्मिला (४०) यांच्यावर गुरुवारी हा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी मालाड पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.

मुंबई - घरासमोर नैसर्गिक विधी केल्याबाबत जाब विचारणे एका कुटुंबाच्या जीवावर बेतले. शेजाऱ्यांनी धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नीची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.

नंदलाल कनोजिया (४५) आणि त्यांची पत्नी ऊर्मिला (४०) यांच्यावर गुरुवारी हा हल्ला करण्यात आला. कनोजिया हे गोरेगाव पश्चिमेतील वासरी हिल परिसरात इस्त्रीचे दुकान चालवत होते. त्यांच्या मुलीचे लग्न झाले असून, १८ वर्षांचा मुलगा शिकत आहे. कनोजिया यांच्या घरासमोरच्या खोलीत रिक्षाचालक असणारे हल्लेखोर इसम भाडेतत्त्वावर राहात होते. कनोजिया आणि त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून खटके उडायचे.

ऊर्मिला गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास पाणी भरायला उठल्या होत्या. त्या घराबाहेर आल्या तेव्हा हल्लेखोरांपैकी एक त्यांच्या भिंतीवर लघुशंका करताना त्यांना दिसला. त्यांनी जाब विचारला तेव्हा त्याने आणि त्याच्या अन्य साथीदाराने हुज्जत घातली. ते ऐकून कनोजिया बाहेर आले. त्यांच्यासोबतही या दोघांनी शिवीगाळ करीत भांडण सुरूच ठेवले. दरम्यान त्यातल्या एकाने कनोजिया यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. ऊर्मिला यांनी पतीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही त्याने जखमी केले. आरडाओरड झाल्याने स्थानिक घटनास्थळी जमले. ते पाहून हल्लेखोर व साथीदार स्थानिकांवरही हल्ला करत रिक्षात बसून पळाले. स्थानिकांनी कनोजिया व त्यांच्या पत्नीला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र कनोजिया यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर गंभीर अवस्थेतील ऊर्मिला यांना नायर रुग्णालयात हलविले.

आरोपी सीसीटीव्हीत कैद

कनोजियांवर हल्ला करणारे रिक्षात बसून आरे चेकनाकापर्यंत पळाले. तिथे त्यांनी रिक्षा सोडली आणि जंगल परिसरात पळून गेले. रिक्षा तपास अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे. दोन्ही आरोपींचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू