शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! न्यायालयात घटस्फोटाची सुनावणी, कोर्ट रुमबाहेर येताच पत्नीचा चिरला गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 14:43 IST

न्यायाधीशांच्या समुपदेशनानंतर एकत्र राहण्यास होणार दिला, बाहेर येताच पत्नी-मुलीवर हल्ला केला.

हसन:कर्नाटकातील हसन जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी स्थानिक न्यायालयाच्या आवारात पतीने सर्वांसमोर पत्नीचा गळा चिरून निर्घृण खून केला. आरोपीने त्याच्या मुलीलाही मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, रस्त्याने जाणाऱ्यांनी मुलीला वाचवले आणि आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले. 

घटस्फोटाची सुनावणी सुरू होतीमिळालेल्या माहितीनुसार, घटना होलेनर्सीपुरा टाऊन कोर्ट कॉम्प्लेक्समधील आहे. चैत्रा असे मृत महिलेचे नाव असून ती थत्तेकेरे गावातील रहिवासी आहे. महिलेचा आरोपी पती शिवकुमार हा येथील होलनरसीपुरा तालुक्यातील रहिवासी आहे. चैत्रा आणि शिवकुमार यांच्यातील घटस्फोट प्रकरणाची सुनावणी हसन जिल्ह्यातील नरसीपुरा न्यायालयात सुरू होती. सुनावणीत न्यायाधीशांनी समुपदेशन केल्यानंतर दोघांनीही एकत्र राहण्यास होकार दिला. 

एकत्र राहण्याचे मान्य केले, पण...दोघांचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते, त्यांना एक मुलगीही आहे. शनिवारी न्यायालयात न्यायाधीशांनी दाम्पत्याला घटस्फोटाची याचिका मागे घेण्यास सांगितले. मुलीच्या भविष्याचा विचार करून हे प्रकरण सामंजस्याने सोडवण्यावर दोघांचा होकार आला. समुपदेशन सुमारे तासभर चालले, त्यानंतर दोघांनी घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला आणि मुलीच्या हितासाठी एकत्र राहण्याचे मान्य केले. यानंतर चैत्रा न्यायालयाच्या आवारातील वॉशरूममध्ये गेली असता तिचा पती शिवकुमार तिच्या मागे आला आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. 

पोलिसांनी दाखल केला गुन्हा आरोपीने पाठीमागून येऊन चैत्राचा गळा चाकूने चिरला. यानंतर त्याने आपल्या मुलीलाही मारण्याचा प्रयत्न केला, मात्र आवाज ऐकून घटनास्थळी लोक जमा झाले आणि आरोपीला पकडले. नंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या हल्ल्यात चैत्रा गंभीर जखमी झाली. होले नरसीपुरा येथून त्यांना रुग्णवाहिकेतून हसनच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू