शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडिओ कॉलवर बोलताना पतीने अचानक केली आत्महत्या, पत्नीने घेतले जाळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 21:30 IST

Suicide Case : धवल सिंग यांचा धाकटा मुलगा महेश सिंग (४०) हा रविवारी दुपारी पत्नीशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलत होता. व्हिडिओ कॉल सुरू असताना अचानक महेश सिंगने सर्व्हिस रिव्हॉल्व्हर काढून स्वत:वर गोळी झाडून घेतली. 

भोजपूर - बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. येथे व्हिडिओ कॉल दरम्यान पतीने पत्नीसमोरच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पतीने आत्महत्या केल्यानंतर पत्नीनेही स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत ती गंभीररित्या भाजली आहे. त्यांना पाटणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना उदावंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिनिया गावातील आहे. धवल सिंग यांचा धाकटा मुलगा महेश सिंग (४०) हा रविवारी दुपारी पत्नीशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलत होता. व्हिडिओ कॉल सुरू असताना अचानक महेश सिंगने सर्व्हिस रिव्हॉल्व्हर काढून स्वत:वर गोळी झाडून घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, महेश सिंग हे तेलंगणातील सिकंदराबाद येथे 16 बिहार रेजिमेंटमध्ये नायक म्हणून तैनात होते. महेश बऱ्याच दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता, असे सांगण्यात येत आहे. रविवारी दुपारी ते पत्नी गुडियासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होते. गुडिया अनेकदा त्यांना फोनवर समजावून सांगायची आणि रविवारीही ती पतीला समजावून सांगत होती. मात्र महेशने सिकंदराबादमध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पतीच्या आत्महत्येमुळे हताश झालेल्या गुडियाने स्वत:वर रॉकेल ओतून पेटवून घेतले. घरातील लोकांना काही समजेपर्यंत ती 85 टक्क्यांहून अधिक भाजली होती. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ आरा सदर रुग्णालयात नेले, जिथे त्याची गंभीर प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी पाटणा येथे रेफर केले. सध्या गुडियावर पाटणा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेची माहिती मिळताच महेशचा मोठा भाऊ जयनाथ सिंह यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहा भावांमध्ये सर्वात लहान असलेला महेश सिंग आपल्या आईसोबत गावात वेगळ्या घरात राहत होता. 2003 मध्ये दानापूरमध्ये सैन्यात भरती झाल्यानंतर ते गलवान व्हॅलीमध्ये आणि सुमारे सहा महिन्यांपूर्वी हैदराबादमधील सिकंदराबाद येथे आले होते. या घटनेनंतर महेशची मुलगी आणि दोन मुलांची प्रकृती बिघडली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिस