मोबाईल ब्लॉक केल्याच्या रागातून पत्नीला नवऱ्याकडून जबर मारहाण

By सदानंद नाईक | Updated: October 4, 2023 17:39 IST2023-10-04T17:38:51+5:302023-10-04T17:39:48+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-३, चोपडा कोर्ट बंदरपाडा येथे आशा चव्हाण ह्या कुटुंबासह राहतात

Husband beats wife out of anger for blocking mobile phone | मोबाईल ब्लॉक केल्याच्या रागातून पत्नीला नवऱ्याकडून जबर मारहाण

मोबाईल ब्लॉक केल्याच्या रागातून पत्नीला नवऱ्याकडून जबर मारहाण

उल्हासनगर : कॅम्प नं-३, शहाड बंदरपाडा परिसरात राहणाऱ्या आशा चव्हाण यांना मंगळवारी सायंकाळी नवरा अशोक चव्हाण याने मोबाईल नंबर ब्लॉक केल्या बद्दल मारहाण केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-३, चोपडा कोर्ट बंदरपाडा येथे आशा चव्हाण ह्या कुटुंबासह राहतात. मंगळवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता पती अशोक चव्हाण याने घर गाठून पत्नी आशा हिला माझा मोबाईल नंबर ब्लॉक का केलास? असा प्रश्न विचारून शिवीगाळ केली. त्यानंतर मारहाण करीत डोक्यात लोखंडी पकड मारून पत्नी आशा हिस जखमी केले.

आशा चव्हाण यांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. मध्यवर्ती पोलिसांनी अशोक चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Husband beats wife out of anger for blocking mobile phone