Husband attacked his wife and five children with an ax, killing four; He went to the police station and said ... | माथेफिरूने पत्नीसह पाच मुलांवर केले कुऱ्हाडीने वार, चौघांचा मृत्यू; पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला...

माथेफिरूने पत्नीसह पाच मुलांवर केले कुऱ्हाडीने वार, चौघांचा मृत्यू; पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला...

ठळक मुद्देमाथेफिरू व्यक्तीने आपल्या पत्नीसह पाच मुलांवर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना बिहारमधील सिवान जिल्ह्यात घडलीया घटनेत गंभीर जखमी झालेल्या पत्नी आणि पाच मुलांपैकी, चार मुलांचा मृत्यू झाला आहेगंभीर जखमी असलेली आरोपीची पत्नी आणि एका मुलीवर उपचार सुरू आहेत

पाटणा - एका माथेफिरू व्यक्तीने आपल्या पत्नीसह पाच मुलांवर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना बिहारमधील सिवान जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पत्नी आणि पाच मुलांपैकी, चार मुलांचा मृत्यू झाला आहे. तर आरोपीची पत्नी आणि एका मुलीवर उपचार सुरू आहेत.

सिवानमधील भगवानपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील बलहा गावातील रहिवासी असलेल्या या माथेफिरूने त्याच्या कुटुंबातील पत्नी आणि मुले,मुली अशा एकूण सहा जणांवर कुऱ्हाडीने वार करत हल्ला केला. या हल्ल्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी आणि एक मुलगी गंभीर जखमी झाले. त्यांना सिवानमधील सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर त्यांच्या गंभीर प्रकृतीचा विचार करून डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारांसाठी पाटणा येथे नेण्यास सांगितले.

आरोपी व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात त्याची मुलगी ज्योती कुमारी, मुलगा अभिषेक कुमार, मुकेश कुमार आणि भोला कुमार यांचा मृत्यू झाला. तर मुलगी अंजली कुमारी आणि पत्नी रीता देवी यांच्या प्रकृती गंभीर आहे. या प्रकाराबाबत आरोपीने सांगितले की, आम्ही कुठेतरी बाहेर फिरून आलो होते. त्यावेळा माझ्या शरीरात कुणीतरी घुसले. त्याने मला कुऱ्हाड उचलून कुटुंबीयांना मारण्यास सांगितले. त्यानंतर मी कुऱ्हाड उचलली आणि वार केला.

दरम्यान, आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. मनोरुग्णाप्रमाणे बोलणाऱ्या पतीने हेसुद्धा सांगितले की, ही घटना घडल्यानंतर मी सिवानचे डीएम आणि ठाण्याला फोन केला होता. मात्र कुणीही फोन उचलला नाही. अखेरीस पोलिसांच्या गस्तीपथकाने घरी येऊन मला अटक केली.

Web Title: Husband attacked his wife and five children with an ax, killing four; He went to the police station and said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.