शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

पत्नीला देखभालीचा खर्च न देणाऱ्या पतीला अटक, हायकोर्टाच्या आदेशानंतर कारागृहात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 03:21 IST

पत्नी व दोन मुलांना देखभालीचा खर्च न देणाऱ्या पतीला अटक करण्याचे आदेश देऊन दीड वर्ष उलटल्यावर अखेर १६ मार्च रोजी पोलिसांनी अटक केली व त्याची रवानगी तळोजा कारागृहात केली.

मुंबई : पत्नी व दोन मुलांना देखभालीचा खर्च न देणाऱ्या पतीला अटक करण्याचे आदेश देऊन दीड वर्ष उलटल्यावर अखेर १६ मार्च रोजी पोलिसांनी अटक केली व त्याची रवानगी तळोजा कारागृहात केली.११ ऑक्टोबर २०१९ रोजी उच्च न्यायलयाने संबंधित व्यक्तीला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवून सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. मात्र, त्या आदेशाचे पालन करण्यात न आल्याने त्याच्या पत्नीने १२ मार्च रोजी न्यायालयात अंतरिम अर्ज दाखल केला आणि दिलेल्या आदेशाचे पालन करण्याची मागणी केली. न्या. आर. डी. धानुका व न्या. व्ही. जी. भिष्ट यांच्या खंडपीठापुढे पत्नीच्या याचिकेवर सुनावणी झाली. मे २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा आदेश योग्य ठरवत त्याची सहा महिन्यांची शिक्षा कायम केली. त्यामुळे जानेवारी २०२१ मध्ये अर्जदार महिलेने पोलिसांना पत्र लिहून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची आठवण करून दिली. मात्र, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेरीस पत्नीने उच्च न्यायालयात धाव घेतली. 

२०१८ मध्ये दिले  होते भरपाईचे आदेशn २०१८ मध्ये पत्नीने तिच्यासाठी व दोन मुलांसाठी देखभालीचा खर्च मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. जुलै २०१८ मध्ये न्यायालयाने तिच्या पतीला पत्नीला देखभालीचा खर्च म्हणून दरमहा १५,००० रुपये व दोन मुलांना प्रत्येकी १०,००० रुपये देण्याचे आदेश दिले. n तसेच दरमहा ८,००० रुपये घराचे भाडेही भरण्यास सांगितले. पुण्यात पतीचे कार फिटनेस क्लब असल्याचा दावा पत्नीने केला. पती जाणूनबुजून देखभालीचा खर्च देत नसल्याचे निरीक्षण नोंदवत त्याला अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले. n मात्र, त्याचे पालन न झाल्याने उच्च न्यायालयाने पोलिसांना जाब विचारला. याप्रकरणी पोलिसांनी २२ मार्च रोजी न्यायालयात अहवाल सादर करुन त्याला १६ मार्च रोजी अटक केल्याची माहिती न्यायालयाला दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईCourtन्यायालय